मुंबई भायखळा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला म्हणजे "लोकशाहीवर हल्ला" असल्याचा आरोप असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. मयुरी संतोष शिंदे यांनी केला. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. मयुरी संतोष शिंदे, यांच्यासह महासचिव संतोष शिंदे, उपाध्यक्ष साक्षी पाटोळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय सामाजिक काम करणाऱ्या सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन या संस्थेने भायखळा व वरळी परिसरातील (प्रभाग क्र. २०७ व १९९) नागरिकांसाठी पाणी, वीज, धार्मिक स्थळे, आरोग्य बाबत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सर्वच धर्माच्या सामाजिक उत्सवांमध्ये सहभाग, तसेच युवक, विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी उपक्रम राबवून असोसिएशनने भायखळ्यात आपली ओळख निर्माण केली आहे. अल्पावधीतच आमच्या संघटनेने नावलौकीक प्राप्त केल्याने काही लोकांमध्ये पोटशूळ होत आहे. त्यामुळेच १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता एका नामांकित गणेशोत्सव मंडळाशी संबंधित गुंडांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री १२.३० वाजता कार्यालयावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उपाध्यक्ष साक्षी पाटोळे यांना मारहाण झाली, तर डॉ. मयुरी शिंदे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंगावधानामुळे त्या बचावल्या असल्याचे मयुरी शिंदे म्हणाल्या.
या प्रकरणी ना. म. जोशी पोलिस ठाण्यात १५ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून, अद्याप काही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप महासचिव संतोष शिंदे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, "भायखळ्यातील कुख्यात गुंड आणि एक बदनाम राजकीय नेता यांच्याकडून पोलिस प्रशासनावर दबाव आणला जात आहे." "आम्ही भायखळा-वरळीतील सामाजिक कार्यातून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची आमची तयारी पाहून काही नेत्यांना अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा हल्ला राजकीय सूडबुद्धीने केला गेला असावा." असेही डॉ. मयुरी शिंदे यांनी सांगितले
उपाध्यक्ष साक्षी पाटोळे म्हणाल्या, “सेवनगर एस.आर.ए. प्रकल्पातील रहिवाशांच्या भाड्याच्या प्रश्नावर आम्ही ठामपणे उभे राहिलो. त्यामुळे काही स्वार्थी गट अस्वस्थ झाले आहेत. संस्थेने या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या गुंडगिरीला आवर घालावा,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
कोणताही राजकीय वारसा नसताना व आर्थिक पाठबळ नसताना स्वबळावर कटर वॉटर मिटर, सामाजिक मंदिर, बौद्धध विहार, पाण्याच्या समस्या त्यावर आमदार, खासदार व नगरसेवक यांच्याकडून दुर्लक्ष झालेली सर्व काम भायखळा व वरळी मध्ये, प्रभाग क्र. २०७ व १९९ मध्ये करत आहेत. यामुळे डॉ. मयूरी शिदि यांच्यावर हल्ला करणे हे त्याचे लक्ष होते परंतु प्रसंगावधानामुळे हाती लागले नाही त्यानंतर ना. म. जोशी पोलिस स्टेशन येथे 15 लोकांवर FIR करण्यात आली. भायखळ्ळ्यातील कुख्यात गुंड व मोठ्या बदनाम नेत्याच्या संपर्कातील कार्यकर्ते आहेत त्यांना वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनावरती दबाव आणण्यात आला आजूनही काही पुरुष व महिला यांच्यावरती FIR करण्यात आली नाही ते मोकाट फिरत आहेत. असा आरोप महासचिव संतोष शिंदे यांनी केला.
आम्ही खासदारकी, आमदारकी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची आम्ही जय्यत तयारी करत असताना भायखळ्यातील कुख्यात गुंड व बदनाम नेता यांना पोट घुसळ झाली गेली चार वर्षे गणपती नवरात्र उत्सव युवांचा क्रिकेट स्पर्धा महिलांचे कार्यक्रम तसेच शेकडो मेडिकल कॅम्पस साठी नाभ होतो व भविष्यातील एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणा करण्यात आली आतापर्यंत एवढ्या प्रमाणात मदत कोणतीही खासदार आमदार व नगरसेवक यांनी केले नाही अशी लोकांमध्ये चर्चा आहे कामामुळे स्थानिक नेते व गुंड यांचा नाकार्तेपणा उघडकीस आला त्यामुळे या हल्ल्याच्या पाठीमागे त्यांनी ते व गुंड असू शकतात असेही संतोष शिंदे म्हणाले,

0 टिप्पण्या