राजकीय वरदहस्त लाभलेल्या आणि पालिका अधिकाऱ्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंधामुळे न्यायालयाच्या नाराजीला नजरेआड करून ठाण्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासनाने अनास्थेचे धोरण अवलंबल्याने ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भ्रष्टाचारातून शाळा ही सुटलेल्या नाहीत .वागळे इस्टेट शिवाजी नगर परिसरात असलेल्या नवोदय विद्यालयाच्या संचालकांनी मनपा अधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने हिर मोती शॉपिंग सेंटर मध्ये असलेल्या शाळेच्या गच्चीवर अनधिकृत बांधकामांबाबत ठाणे महानगर पालिकेच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून ही त्याची अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
कन्नड सेवा संघाच्या वतीने मुलुंड चेक नाका पश्चिमेला एल बी एस मार्गालगत असलेल्या शिवाजी नगर परिसरात असलेल्या हिर मोती शॉपिंग सेंटर मध्ये कन्नड सेवा संघाच्या वतीने नवोदया विद्यालय प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चालविण्यात येते.शिवाजी नगर , शास्त्रीनगर ,किसन नगर मुलुंड चेकनाका आदी जवळपास राहणारे विद्यार्थी येथे शिकतात सदर शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या गच्चीवर आच्छादित शेड उभारून त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे .वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केवळ पावसाळी हंगामात तात्पुरत्या स्वरूपात हंगामी शेड उभारण्यास मुभा आहे . मात्र ते तीन फुटां पेक्षा कमी असावे .शाळेची कॅन्टीन ही याच ठिकाणी आहे. तसेच संस्कृतिक कार्यक्रमासाठी या जागेचा वापर केला जातो. या सर्व प्रकाराकडे ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी काना डोळा का करताहेत हे एक न उलगडणारे कोडेच आहे.!गेल्या सहा सात वर्षांपासून कन्नड सेवा संघाच्या या संस्थेवर धनंजय शेट्टी आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांचा कब्जा आहे . संस्थेच्या मागील पार पडलेली निवडणूक हो बिनविरोध स्वरुपाची होती. त्यामुळे विरोधच नसल्याने संचालकांची येथे मनमानी सुरू असून त्यांनी या अनियंत्रित बेबांदशाहीमुळे पालक आणि विद्यार्थी त्रस्त आहेत. कन्नड भाषिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत देण्यात येते .तर इतर भाषिक विद्यार्थ्यांना भरमसाठ फी आकारली जाते.तसेच शाळेचा गणवेश केवळ अरिहंत याच दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जाते.याशिवाय पी टी ए फंड म्हणून जमा होणाऱ्या निधीचे पुढे काय होते . याबाबत पालक आणि विद्यार्थी ही अनभिज्ञ आहेत .
संचालकांच्या मनमानी विरूध्द आवाज उठवणाऱ्या पालकांना त्याच्या पाल्यास शाळेतून काढून टाकण्याचे सुनावले जाते.असे पालक वर्गाचे म्हणणे आहे .जवळपास दुसरी शाळा नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची मजबुरी आहे. त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नाही. शाळेकडे स्वतःचे असे सभागृह अथवा खेळाचे मैदान नाही. वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी मुलुंड येथील पालिकेच्या मैदानाचा वापर केला जातो.इतकेच नव्हे तर शाळेची विस्तारित इमारत बांधताना व्यवस्थापनाने सर्व नीतीनियम धाब्यावर बसवून हिरा मोती शॉपिंग सेंटर आणि मिळतोवन प्लाझा यांच्या मधील पार्किंगची जागा गिळंकृत केली असून दोन इमारती जोडण्याचा प्रताप केला आहे. सदरहू शाळेचे संस्था चालक आणि अशा गैरप्रकारांना पाठीशी घालणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.

0 टिप्पण्या