जे जे बघायला मिळत आहें ते ते अतिशय निंदनीय आहे, ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम केले, त्याग केला, उपाशी राहिले, अपमान आणि दुःख पचवले, संघर्ष करून ज्यांना हे अच्छे दिन दिले, हे दीन लोक त्यांना धोका देत आहेत, त्यांच्या त्याग आणि कर्तृत्वाचा उपमर्द करीत आहेत. लक्ष्मी पूजना पासून तर महादेवाची महारात्र पर्यन्त चे सोपस्कार, कर्मकांडच काय तर बुवाबाजी ही करत बसलेले आहेत. लक्ष्मी आणि तिचे पूजन जर यांना संपत्ती आणि समृद्धी देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेले सारे संवैधानिक हक्क आणि अधिकाराचा त्याग करून खुशाल हिंदू धर्मात परत जा म्हणा! अश्या भटाळलेल्या बौद्धांनी हिंदू अस्पृश्यच राहिलेलं बर. हिंदू धर्मीय लोक लगेच तुम्हाला स्वीकारतील, तुम्हाला तुमचे मडके आणि कमरेचा झाडू लगेच परत करतील, जो खरच तुमचा हक्क अधिकार आहे.
शिक्षणातील शिष्यवृत्त्या लक्ष्मीच तुम्हाला बहाल करू शकते, नोकरीतील आणि राजकीय आरक्षण लक्ष्मी तुम्हाला देत असेल तर कशाला बौद्ध धर्मात राहता, निघा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर परत जा, त्याच नरकात जिथून तुम्हाला बाबासाहेबांनी इथवर आणले. तुम्ही थोडा ही विलंब न करता परत हिंदू म्हणून परत जा, मनात येईल तसे वागा, कुणी तुम्हाला नीतिमत्ता गहाण ठेवली का असे विचारणार नाही, बैक टू सोसाइटी म्हणणार नाही. शिल पाळा म्हणणार नाही. मागच्या दारातून आत आलेले देव खुशाल दिवाणखान्यात लावण्यासाठी कुणीही तुम्हाला टोकणार नाही, लेकरांना विहारात तर कधी नेता आले नाही तुम्हाला, मंदिरात न्या, मरीआई कडे न्या, वित्तू बाबा कडे न्या, ताज वाल्या कडे न्या, आणि ते तुम्ही कारताना दिसताच, लक्ष्मी, राम, कृष्ण, गौरी, गणपती हे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेत असतील तर बाबासाहेबांची प्रज्ञा तुमच्या काय कामाची? करुणा, मैत्री, न्याय या प्रकाशमान तत्वांना नाकारून तुम्ही तेलांच्या दिव्यांना स्वीकारले आहे तर तुम्हाला ते दिवे लखलाभ असो.
ज्या सडलेल्या गटारातून बाबासाहेबांनी तुम्हास बाहेर काढले, ते गटार तुम्हाला प्रिय वाटत असेल तर त्या गटाराच्या घाणेत खुशाल लोळा! पण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी, बुद्धांचे उपासक म्हणून वावरू नका, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, महाबोधी, सांची यांच्या सोबत नाते आहे हे ही सांगू नका, फुले, शाहू, पेरियार यांच्या जयंतीत शुभ्र वस्त्र परिधान करून स्वतःला समाजात मिरऊ नका. गौरी, गणपती, राम, कृष्ण, ब्रह्मा विष्णू महेश वाल्यांच्या मुली, मुलांसोबत लग्न संबंध जोडून बघा कशी तुम्हाला तुमची औकात दिसून येईल.
जा मजा करा, पूजा करा, गणपती बसवा, नवरातीत्रील पेंडल मध्ये पोर-पोरी नाचायला पाठवा, महाशिवरात्रीत उपास तापास करा, मजा करा, पण कृपा करून बुद्ध, बाबासाहेब, रमाई, भिमाई, फुले, शाहू, कबीर, राजा अशोक यांच्याशी यानंतर नाते ठेऊ नका, नाते सांगू नका, उत्सवी भोगवादी झालेल्या निर्बुद्ध नालायकांनो जा मजा करा, मस्ती करा!
तुम्हाला जयभीम ही म्हणणे म्हणजे तुम्ही पुजलेल्या तथाकथित लक्ष्मी चा अपमानच म्हणावे.
प्रीतम प्रियदर्शी
आवाज इंडिया टीवी
0 टिप्पण्या