नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात विनानसेवा सुरू होईल. नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. नवी मुंबई विमानतळामुळे हवाई वाहतुकीची क्षमता वाढणार आहे आणि परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी 10 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल. प्रतिवर्षी 90 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळण्याच्या अंतिम क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत. पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे. जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे. टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.

0 टिप्पण्या