महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार २०२५” अंतर्गत राज्यातील एकूण ६७ पुरस्कारांपैकी कोकण विभागाने तब्बल ४५ निर्यातदार उद्योजकांना सुवर्ण व रजत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात मुंबईतील १२ उद्योजकांना १७, ठाणे १४ उद्योजकांना १७, पालघर ३ उद्योजकांना ५, रायगड २ उद्योजकांना २आणि रत्नागिरीतील २ उद्योजकांना ४ असे कोंकण आणि मुंबईतील ३३ उद्योजकांना एकूण ४५ पुरस्काराने गौरविण्यात आले. या उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्य पातळीवर कोकण विभागाला मानाचा तुरा मिळवून दिला आहे. “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025” अंतर्गत राज्यस्तरीय एकूण 67 पुरस्कारांपैकी कोकण विभाग आणि मुंबई प्राधिकरण विभागाला मिळून 45 पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यापैकी कोकण विभागाचे 21 पुरस्कार आहेत. ही कामगिरी कोकण विभागातील उद्योजकतेच्या प्रगतीचे द्योतक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या निर्यातदार उद्योजकांसाठी राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा, हॉटेल ताज लँड्स बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 रोजी संपन्न झाला. मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे या पुरस्कारांचे वितरण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन, कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच कोकण-मुंप्रावि विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांनी यंदाही राज्यात आपले वर्चस्व राखले आहे. या जिल्ह्यातील हिमल लि., अपार इंडस्ट्रीज लि., सिमॉसिस इंटरनॅशनल, झेनीथ इंडस्ट्रीयल रबर प्रॉडक्ट्स, ज्योती स्टील इंडिया, जी. एस. एक्स्पोर्ट्स, जॅब्झ इंटरनॅशनल प्रा. लि. आणि नवकार फॅब यांना सुवर्ण पुरस्कार देण्यात आले. तर कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, एच. डी. फायर प्रोटेक्शन, दुधीया सिंथेटिक्स, फुई गो टेक्स आणि दलाल प्लास्टिक्स या कंपन्यांना रजत पुरस्कार प्रदान करण्यात आले.रायगड जिल्ह्यातील असावा इन्स्युलेशन प्रा. लि. या कंपनीला सुवर्ण पुरस्कार, तर श्रीकेम लॅब यांना रजत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील डी. डेकोट एक्स्पोर्ट्स यांना सुवर्ण तर अमीटी लेदर इंटरनॅशनल यांना रजत पुरस्कार प्राप्त झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रिया लाईफ सायंसेस आणि जिलानी मरीन प्रॉडक्ट्स या दोन्ही कंपन्यांना सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या यशामागे कोकण विभागात राबविण्यात आलेल्या निर्यात कॉन्क्लेव्ह उपक्रमाचा मोठा वाटा आहे. या उपक्रमांतर्गत DGFT, CUSTOM, EPC व इतर शासकीय संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून निर्यातदारांना थेट मार्गदर्शन तसेच त्यांच्या अडचणींचे निवारण करण्यात आले. याशिवाय District Export Promotion Committee (DEPC) बैठकींचे नियमित आयोजन करून निर्यातक्षम उद्योगांना सहाय्य करण्यात आले, असे उद्योग विभागाने सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी व उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ यांनी सर्व पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सर्व जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.
0 टिप्पण्या