बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये 14 ऑक्टोबर रोजी मोर्चा होणारच. अशी घोषणा सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाचा मार्ग पोलिसांनी कापला. मूळ ५.५ किमीचा मार्च ७५० मीटरपर्यंत कमी केला. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा सामाजिक मोर्चा शांततेत पार पडेल असे केंद्रीय सामाजिक मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. यावेळी खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, प्रा.जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आमदार संजय बनसोडे, भाई गिरकर, अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, नितीन मोरे, सुनील निर्भवणे, मिलिंद सुर्वे, विलास रुपवते आदी विविध पक्ष तसेच गटांचे नेते यावेळी उपस्थित होते.
बोधगया येथील महाबोधी मंदिराचे पूर्ण नियंत्रण बौद्ध समुदायाकडे सोपवण्याच्या मागणीसाठी मोर्चाचा प्रस्तावित मार्ग. सुरुवातीला हा मोर्चा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत जाण्याचे नियोजन होते, परंतु पोलिसांनी त्याऐवजी मेट्रो सिनेमापासून सुरू होणारा छोटा मार्ग सुचवला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉजिस्टिक आणि नियामक कारणांमुळे मूळ ५.५ किमीच्या मार्गाला परवानगी देता येत नाही. अधिकाऱ्यांनी सुचवलेला पर्यायी मार्ग अंदाजे ७५० मीटर लांबीचा आहे."मोर्चाच्या तयारीसाठी, आमच्या समितीच्या एका शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त (झोन १) डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन मूळ मार्गासाठी परवानगी मागितली. तथापि, ही विनंती नाकारण्यात आली, असल्याची माहिती गौतम सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

0 टिप्पण्या