Top Post Ad

श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ .... तब्बल 2 लाख 75 हजार रुपये पुरस्काराचे वितरण

मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- २०२५’चा पुरस्कार वितरण सोहळा महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी तब्बल 2 लाख 75 हजार एवढी रक्कम पुरस्कार म्हणून वितरीत करण्यात आली.  यावेळी परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा -२०२५ अंतर्गत प्रशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.   महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात तसेच  उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक  प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी मुंबई महानगरातील सार्वजनिक मंडळांसाठी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते.  श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२५ मध्ये विविध प्रकारांतील विजेते श्रीगणेश मंडळ तसेच वैयक्तिक पुरस्कारार्थींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.


यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे अभिनव पद्धतीने आयोजन करणाऱ्या मंडळांना पुरस्कार दिला जातो. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार, सर्वोत्कृष्ट मूर्तीकारांना गौरविले जाते. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदा या स्पर्धेचे ३६वे वर्ष असून या स्पर्धेत ६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता.  .या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी,  उप आयुक्त (विशेष तथा परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितांना संबोधित करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी म्हणाले की, यंदाचा श्रीगणेशोत्सव गणेशभक्तांसोबतच प्रशासनासाठी देखील वेगळा होता. पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उत्तम नियोजन तसेच श्रीगणेश मंडळ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, यंदाच्या श्रीगणेशोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरपुरकतेला प्राधान्य देत यंदा शाडूच्या मातीसोबत पर्यावरणपूरक रंगसुद्धा मूर्तीकारांना निःशुल्क वितरित करण्यात आले. अत्यंत कमी वेळात उत्तम नियोजन करत सर्व श्रीगणेश मंडळांच्या सहकार्याने निर्विघ्नपणे आणि अत्यंत उत्साहात गणेशोत्सव पार पडला, यासाठी सर्व श्री गणेश मंडळ, श्रीगणेश भक्त, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशासनाकडून विशेष अभिनंदन करतो. पुढील वर्षीचा श्रीगणेशोत्सव याहून अधिक उत्तमप्रकारे साजरा करू, अशी ग्वाहीदेखील सैनी यांनी यावेळी दिली.

उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक  प्रशांत सपकाळे प्रास्ताविकात म्हणाले, यंदा मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मुंबईसाठी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी विविध बाबींनी विक्रमी ठरला. महानगरपालिकेने यंदा १ हजार टन शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले. तर, १ हजार मूर्तीकारांना जागा आणि सुविधाही उपलब्ध करून दिल्या. यंदा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. लोकभावना आणि प्रशासकीय निर्णय याचा उत्तम संगम यंदा दिसून आला, असेही  सपकाळे म्हणाले. 

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह  सुरेश सरनोबत म्हणाले की, महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या विविध सुविधांमुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिक उत्तमप्रकारे पार पडला. १३३ वर्षांची श्रीगणेशोत्सवाची परंपरा टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी सर्वानीच प्रयत्न करावे. तसेच, महाराष्ट्रात पडलेल्या ओल्या दुष्काळातील पीडितांना श्रीगणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. दरम्यान, धारावी येथील हनुमान सेवा मंडळाने पुरस्काराची रक्कम दुष्काळाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा केली. 

  • *प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)* 
  • स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सातबंगला, अंधेरी (पश्चिम)
  • *द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
  • पंगेरीचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भायखळा (पूर्व)
  • *तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
  • बालमित्र कला मंडळ, स्टेशन रोड, विक्रोळी (पश्चिम)
  • *सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)* 
  • श्री. राजन झाड, युवक उत्कर्ष मंडळ, मालवणी
  • *सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
  • श्री. श्रीकांत साळवी, बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम)
  •  *उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
  • १) श्री. हनुमान सेवा मंडळ, धारावी
  • २) परेरावाडी मोहीली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, साकीनाका

*प्लास्टिक बंदी / थर्माकोल बंदी / पर्यावरणविषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
    १.  शिवगर्जना तरुण मित्र मंडळ (मरोळचा मोरया), गणेश मैदान, अंधेरी (पूर्व)
    २.  श्री ओमसिद्धी विजय मित्र मंडळ, लोअर परळ
*शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)*
शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माहीम
*सामाजिक कार्य / समाजकार्य / अवयवदान जागृती- पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)* 
श्री श्रद्धा मित्र मंडळ, दहीसर

  • *प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे*
  • *१. उल्लेखनीय नेपथ्य* - परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
  • *२. उल्लेखनीय संकल्पना*- रंगारी बदक चाळ, काळाचौकी
  • *३. वैशिष्ट्यपूर्ण विषय मांडणी*- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, लोअर परळ
  • *४. सुबक श्रीगणेशमूर्ती*- ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भायखळा
  • *५. भव्य आरास*- इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ (फोर्टचा राजा)
  • *६. उत्कृष्ट विषयाची संकल्पना*- शिवसम्राट सार्वजनिक उत्सव मंडळ
  • *७. उत्कृष्ट सजावट*- विकास मंडळ, साईविहार, भांडूप
  • *८. नाविन्यपूर्ण माहिती*- शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग (पूर्व)
  • *९. प्रसन्न वातावरणनिर्मिती*- प्रतिक्षानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  • *१०. सुंदर देखावा*- अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर
  • *११. उल्लेखनीय विषय मांडणी*- भावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहीसर
  • *१२. समाज प्रबोधन*- श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क,  बोरीवली (पश्चिम)
  • *१३. उत्कृष्ट नेपथ्य*- श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पारशीवाडा, अंधेरी (पूर्व)
  • *१४. शैक्षणिक जनजागृती*- गणेश क्रीडा मंडळ, काजूवाडी, अंधेरी (पूर्व)
  • *१५. राष्ट्रपुरुषांचे विचार*- बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ, विभाग क्रमांक-१, गोरेगाव (पश्चिम) 

*परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा-२०२५* 
*सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ*
*उप आयुक्त (परिमंडळ - १)* - डी विभाग - स्थळ : गिरगाव चौपाटी 
*उप आयुक्त (परिमंडळ - २)* -  जी उत्तर विभाग - स्थळ : केळूसकर मार्ग (उत्तर), दादर
*उप आयुक्त (परिमंडळ - ३)* - एच पश्चिम विभाग - स्थळ : बँडस्टँड, बी. जे. रोड, वांद्रे (पश्चिम)
*उप आयुक्त (परिमंडळ - ४)* - के पश्चिम विभाग - स्थळ : जुहू समुद्रकिनारा  
*उप आयुक्त (परिमंडळ -५ )* - एम पश्चिम विभाग - स्थळ : चरई तलाव, हेमू कलानी मार्ग, चेंबूर 
*उप आयुक्त (परिमंडळ - ६)* - एस विभाग - स्थळ : गणेश घाट, पवई तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, पवई 
*उप आयुक्त (परिमंडळ - ७)* - आर मध्य विभाग - स्थळ : गोराई जेट्टी, बोरिवली (पश्चिम)  

  • *सर्वोत्तम कृत्रिम विसर्जन स्थळ*
  • *उप आयुक्त (परिमंडळ - १)* - डी विभाग - स्थळ : गिरगांव चौपाटी
  • *उप आयुक्त (परिमंडळ - २)* - जी दक्षिण विभाग - स्थळ : जांभोरी मैदान, वरळी
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ३)* - के पूर्व विभाग - स्थळ : हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू), 
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ४)* - पी उत्तर विभाग - स्थळ: शांताराम तलाव
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ४)* - पी दक्षिण विभाग - स्थळ: बांगूर नगर तलाव
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ५)* - एल विभाग - स्थळ : वस्ताद लहुजी साळवे मैदान, विजय फायर मार्ग, चांदिवली 
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ५)* - एम पूर्व विभाग - बाळासाहेब ठाकरे उद्यान, प्रभाग क्रमांक १४१
  • *उप आयुक्त  (परिमंडळ - ६)* - एस विभाग - स्थळ : महानगरपालिका भूखंड न ७/४. क्र. भु. कोपरी, पवई 
  • *उप आयुक्त (परिमंडळ - ७)* - आर दक्षिण विभाग – स्थळ : लालमाती मैदान, अशोक नगर, कांदिवली (पश्चिम)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com