महाबोधी महाविहार ईतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, सर्व आंबेडकरी संघटना, सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून येत्या 14ऑक्टोबर 2025रोजी 11वाजता भायखळा राणीबाग ते आझाद मैदान अशी मुंबईत शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे, या रॅलीत मुंबईतील सर्व बौद्ध, आंबेडकरी जनतेने मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)मुंबई महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे.
या बाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले, बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धाचे जागतिक श्रद्धास्थान आहे, महाकारुणि क तथागत भगवान बुद्धाना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या पूर्ण ताब्यात नाही, ज्या कर्मकांड, पिंडदाना ला, अंधश्रद्धेला भगवान बुद्धानी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्यामुळे जगभरातील बौद्धाच्या भावना दुखावल्या जात आहेत. प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्ट कडे असतात मग बौद्धाचे महाबोधी महावीहार बौद्धाच्या ताब्यात का नाही?, बौद्धाच्या बुद्धविहार ट्रस्ट मध्ये बौध्द ट्रस्टी का नको? महाबोधी महाविहार बौद्धाचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजेया व्यापक आंदोलना साठी रिपब्लिकन नेते व आंदोलनाचे निमंत्रक ना. रामदासजी आठवले साहेब, प्रा. जोगेद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नाना इंदिसे, खासदार- चंद्रकांत हंडोरे, खासदार -वर्षाताई गायकवाड, अर्जुन डांगळे, अक्षय आंबेडकर, राजू वाघमारे, जयदेव गायकवाड, अविनाश महातेकर, राम पंडागळे, भाई गिरकर, तानशेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश केदारे, सागर संसारे, नितिन मोरे, दिलीप जगताप, मिलिंद सुर्वे, विलास रुपवते, रवी गरुड, आकाश लामा, पूज्य भदंत -राहुल बोधी महाथेरो, भदंत -विरत्न थेरो, भदंत आयुपाल, भदंत शांतीरत्न, भदंत लामा आदी अनेक मान्यवर व सर्व बौद्ध संगटना आणि रिपब्लिकन गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे मुंबईतील सर्व बौद्ध संगठनांनी या मुंबईत होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या सख्येने उपस्थीत रहावे असे आव्हान मुंबई प्रदेश महासचिव (आर पी आय) आयु. विवेक गोविंदराव पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpg)
0 टिप्पण्या