नुकतीच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा नेर येथील रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली या सभेमध्ये नेर तालुक्याची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली व प्राध्यापक विनोद अंभोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष नामदेवराव थुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेच्या अध्यक्षा नेर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची तालुका अध्यक्ष वनिताताई इंगोले (मोरे )होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष नामदेवराव थुल सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती गोविंदराव मेश्राम कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुभाषराव मनवर प्रामुख्याने उपस्थित होते
स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यामध्ये नेर तालुका अध्यक्ष वनिताताई इंगोले (मोरे)कार्याध्यक्ष गजानन राऊत सरचिटणीस आशय पाटील तर अमोल गावडे जितेंद्र खडसे आशिष जगताप उपाध्यक्ष राहुल निमकर पांडुरंग पांडे किसन मडावी अतिरिक्त सरचिटणीस अभय कीर्ती अघम मुख्य संघटक प्रतीक गजघाटे संघटक रामदास धोपेकर कोषाध्यक्ष स्वप्निल राऊत सह कोषाध्यक्ष शुभम कीर्तीकार संघटन सचिव निकिता इंगोले सुषमा मोहोड राजकन्या तलवारे माया मेश्राम आशा गणवीर शितल चव्हाण महिला प्रतिनिधी आणि कार्यकारणी सदस्यांमध्ये प्राध्यापक विनोद अंबोरे प्राध्यापक निलेश मोखाडे शालिक माने दिलीप चव्हाण शालिकराव इंगोले प्रवीण रामटेके सदाशिवराव खासदार सुरेखाताई गुजर शोभाताई नाईक मोक्षप्रदा जवंजाळ संपदा पिल्लेवान नन्नवरेजी सतीश तायडे पंचशीला खडसेअंकुश ढबाले श्रीमती कोल्हे मॅडम शिवदास राऊत प्रवीण कांबळे देवेंद्र कांबळे आदींचा समावेश आहे यावेळी उपस्थित सगळ्यांनी प्राध्यापक विनोद अंबोरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने झालेल्या सत्कारा नंतर सदिच्छा देऊन आदर व्यक्त केला
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद मोरे सूत्रसंचालन गजानन राऊत व आभार प्रदर्शन जितेंद्र खडसे यांनी मानले सभेला पत्रकार लक्ष्मण वानखडे तसेच भगत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

0 टिप्पण्या