Top Post Ad

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

महाराष्ट्र रत्न फुले शाहू आंबेडकर ज्ञान विचार मंच च्या वतीने मागील पाच ऑगस्ट रोजी  लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षे चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच घेण्यात आला समारंभाच्या अध्यक्षस्थानी नेहरू  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय जी मांजरे होते प्रमुख अतिथी नेहरू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.प्रवीण बनसोड कास्ट्राईब  कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष वनिता इंगोले (मोरे ) प्रज्ञाशोध :आंबेडकरी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी विचार मंच चे प्रमुख मार्गदर्शक प्रा. जगदीश पाटील   नेहरू  महाविद्यालयाचे उप प्राचार्य एच. एच. शेख सर महाराष्ट्र रत्न फुले शाहू आंबेडकर ज्ञान विचार मंच चे संस्थापक ऋषभ मेश्राम प्रज्ञाशोध: आंबेडकर विचार मंच चे संस्थापक डॉ. शरद मोरे होते 


 स्थानिक नेहरू महाविद्यालय,प्रज्ञाशोध: आंबेडकर विचार मंच, प्रज्ञाशोध:आंबेडकरी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी विचारमंच च्या सहकार्याने नेहरू महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजनेच्या हॉलमध्ये हा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विभागून नंदिनी तीमाने व तेजस्विनी राठोड या दोन विद्यार्थिनींना देण्यात आला द्वितीय क्रमांक नयन खडसे तृतीय क्रमांक स्नेहा खोडे अनुराधा भेंडारकर दिव्यांनी ठाकरे श्रावणी ठाकरे  यांना तर प्रोत्साहन पर चतुर्थ बक्षीस दर्शना ढगे क्षमता चव्हाण चैतली कोडे व शिवानी सरडे यांना देण्यात आले  बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कुकडे आभार प्रदर्शन प्रा. श्रीराम चव्हाण यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा उईके,प्रा. मिलन तायडे प्रा. ममता गुल्हाने प्रा. नितीन घरत प्रा. निलेश  दरेकर प्रा.निशा दहाट राजेंद्र मेश्राम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह परिसरातील गणमान्य  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com