’ आवाज ओळखला नाही म्हणून एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला फैलावर घेत असल्याचा एक व्हिडिओ बराच फिरताना दिसतो. अजित दादाचा स्वतःच्या आवाजावर तरी विश्वास आहे का?मग इतरांनी का ठेवावा?
अकरा वर्षांपूर्वीची घटना. लोकसभेची निवडणूक. प्रचार थांबला होता. तरीही दादांनी मासाळवाडी गावात प्रचार सभा घेतली. "माझ्या बहिणीला मतदान नाही केले तर मी गावाचे पाणी बंद करीन हा!" असा दम अजितदादा यांनी मासाळवाडी येथील गावात प्रचार सभेत दिला होता. त्याची ऑडिओ क्लिप मीडियावर प्रसारित झाली. मतदारांना प्रभावित करणे हा इंडियन पिनल कोड कलम 171 (क) प्रमाणे गुन्हा आहे. त्याबद्दल मी कोर्टात केस दाखल केली. तर स्वतःला टग्या म्हणवणारे अजित दादा म्हटले की तो माझा आवाज नाही. कुणीतरी माझा आवाज काढला आणि खोपडे यांनी खोटी केस दाखल केली. मासाळवाडीतील लोकांना बारामती शहरात मोर्चा काढायला लावून माझ्याविरुद्ध कारवाई करण्याबद्दल प्रांत अधिकाऱ्याला निवेदन देण्यास सांगितले. तो माझा आवाजच नाही असे सर्वत्र मेडियाला उत्तर देऊ लागले.कोण खर बोलतंय हे ओळखणे साठी "दादा आपण दोघांची नार्को टेस्ट करू" असे मी आव्हान दिल्यावर दादा स्वतःच्या आवाजालाच टरकले. फॉरेनसिक लॅबोरेटरी मार्फत आवाजाची खात्री केली. दहा वर्षानंतर बारामतीतील एका खमक्या प्रामाणिक कोर्टाने मान्य केले की तो दादांचाच आवाज आहे. अजितदादांनी स्वतःचाच आवाज कोर्टाने आदेश देऊनही मान्य केला नाही. स्वतःच्या आवाजाला घाबरले. आता वकिलांची मोठी फौज नेमून कोर्टाने केलेल्या ऑर्डरला वरच्या कोर्टात आव्हान दिले. एवढं होऊ न ही तो आवाज आपलाच आहे हे मानायला दादा तयार नाहीत. मग नुकतीच पोलीस दलात आलेली तरुण पोरगी दादा तुमचा आवाज कसा काय बरे लक्षात ठेवील? एका सामान्य अनोळखी कार्यकर्त्याने फोन केला की तोच फोन अधिकाऱ्याला द्यायला सांगून त्यालाच आदेश देणे हे कसले प्रशासन ?ऑपरेशन करण्याच्या दोन पद्धती आहेत. आधुनिक प्रगत विज्ञान नुसार सर्जन पद्धती व पुरातन वैदू पद्धती. दादा दुसरी पद्धत वापरतात. गावोगावी त्यांचे तीन चार लाभार्थी कार्यकर्ते असतात. निवडणुकीच्या वेळी ते मतदान मिळवण्याचे काम करतात. आणि एरवी एजंट म्हणून. त्यांची कामाची पद्धत ही अशीच अजित दादा स्टाईल वैदू पद्धती असते. दादा म्हणजे लोकशाहीतून नव्हे तर घराणे शाहीतून निर्माण झालेले नेतृत्व. घराण्याच्या उद्धारा शिवाय त्यांच्यापुढे विशाल दृष्टीकोन नाही. त्यामुळे कावेबाज आर्य ब्राह्मणाने यांचाच वापर घराणे संपवण्यासाठी केला. कालांतराने त्यांचा उपयोगत या देशातील राज्यघटना आणि लोकशाही संपवण्यासाठी करण्यात येईल.
अशा नेत्यांना दूरदृष्टी नसते ते 100 मीटर रनिंग स्पर्धेचे विजेते असतात.
मॅरेथॉन रेसचे(42195 मिटर ) नव्हे. त्यामुळे त्यांचा वापर छोट्या चकमकी(battle)साठी केला जातो सतत चालणाऱ्या मोठ्या युद्धासाठी (war )नाही.
अजित दादा सारख्या कॅबिनेट मंत्र्यांच काम हे संपूर्ण राज्यासाठी प्रशासनामध्ये कामाची नियमात बसणारी एक शिस्तबद्ध पद्धत आखून देणे हे असते.उठ सूट छोट्या कामासाठी फोन करत बसणे हे त्यांचे काम नसते. 14 कोटी लोकसंख्ये मध्ये किती लोकांसाठी अजित दादा फोन करत बसणार? निर्माण केलेली पद्धत काम का करत नाही याचा शोध घेऊन संबंधित खाते प्रमुखाला जाब विचारले हे त्यांचे काम असते.
पण दहावी पास झालेला माणूस आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांना कसे वाकवू शकतो हे दाखवण्यासाठी न्यूनगंडातून आलेले हे शल्य दिसते आहे. ’एकच वादा अजित दादा’ हे सिद्ध करण्याच्या नादात असे वैदू पध्दतीचे काम चालते.
म्हणून दादा बोलताना काळजी घ्या तसेच खाताना सुद्धा! गाडी भर पुरावे घेऊन आलेला नागपूरचा बामनाचा पोरगा त्याने तुम्हाला असेच खिंडीत पकडले ." चक्की पीशिंग, पिशिंग, पिशिंग अशी धमकी दिली. मग तुम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने बांधलेला पवार घराण्याचा चिरेबंदी वाडा पाडून ,सोडून रेशीम बागेच्या पालखीचे भोई झालात. आणि आम्हा बारामती करांच्या गळ्यात बळजबरीने जानवे अडकवले. भविष्याच्या दृष्टीने हे फार वाईट झाले. दादा आपल्या बारामती तालुक्याला मोठी परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. ती तुमच्या बोलण्याने व खाण्याने बदनाम करू नका हो!
सुरेश खोपडे
0 टिप्पण्या