कीर्ती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर उपक्रम राबवत असते. त्यातील एक उपक्रम म्हणजे कीर्ती जागर , ह्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी स्वयंसेवक मुंबई उपनगरातील १०१ गणेशोस्तव मंडळांमध्ये पथनाट्य सादर करून जनजागृती करत असतात मात्र गेल्या वर्षी त्यांनी १५१ पथनाट्य सादर केली. ह्या वर्षीही कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश दळवी, प्रा. प्रतिभा बिश्वास आणि प्रा. श्रद्धा राजे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी तस्करी ह्याविषयावर पथनाट्य बसवण्यात आले, ह्यात प्रकृती फाउंडेशन ह्या संस्थेची त्यांना साथ मिळाली. स्वयंसेवकांनी गणेशोत्सवाच्यापूर्वी आठवड्याआधीच ह्या उपक्रमाच्या तयारीला सुरुवात करून उत्सवाच्या तब्बल पहिल्या ५-६ दिवसांमध्ये १०० गणेशोस्तव मंडळांमध्ये पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
जसं प्रत्येक जण गणेशोत्सवात आपापल्या परीने बाप्पासाठी काही ना काही करत असतात तसंच दिनांक ३सप्टेंबर रोजी स्वयंसेवकांनी बाप्पाच्या चरणी एका दिवसात ५१ पथनाट्य सादर करण्याचा प्रण घेत तो पूर्ण ही करून दाखवला. मानवी तस्करी हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवी तस्करीची साखळी तुटावी ह्यासाठी हा प्रयत्न करत असताना स्वयंसेवकांचा उत्साह वाढतच चालला होता आणि त्यात कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या तसेच महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडेय ह्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे स्वयंसेवकांनी १५१ पटनाट्यांचा प्रण हा २०१ वर नेऊन ठेवला, ह्या संपूर्ण उपक्रमात २५हून अधिक स्वयंसेवकांचा उस्फूर्त सहभाग होता तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी ही हयात त्यांना मोलाचे सहकार्य केले. वेळप्रसंगी ऊन वारा पाऊसासोबत वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत दादर, चेंबूर, कुर्ला, विक्रोळी, ग्रँट रोड, परळ, धारावी, वरळी आणि प्रभादेवी सारख्या वेगवेगळ्या परिसरात जाऊन पथनाट्य सादर केली ह्यात खूप लोकांचा भावूक प्रतिसाद ही त्यांना मिळाला.ह्याऊपक्रमाबद्दल बोलताना स्वयंसेवकांनी सांगितले की २०१ आकडा पुर्ण करण कठीण होत पण बाप्पाच्या कृपेने आणि सर्वांच्या साथीने हे शक्य झालं ! स्वयंसेवकांनी दिनांक ५सप्टेंबर रोजी प्रभादेवीचा महागणपती ह्या मंडळामध्ये शेवटच पथनाट्य सादर करून कीर्ती जागर ह्या उपक्रमाची सांगता केली. ह्या उपक्रमाामध्ये महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश दळवी आणि प्रा. प्रतिभा बिस्वास ह्यांनी फक्त पाठिंबाच नाही दिला तर त्याची काळजी ही घेतली. आणि त्यासोबतच प्रकृती फाउंडेशन च्या किमया मॅडम ही स्वयंसेवकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. संपूर्णतः कीर्ती जागर हा उपक्रम सर्व स्वयंसेवकांच्या स्फूर्तीने आणि निष्ठेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडेय, उपप्राचार्य मीनल म्हापुस्कर , अपूर्वा यादव आणि सर्वच कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या लाभलेल्या प्रोत्साहन तसेच मार्गदर्शनामुळे सोबतच माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडला.

0 टिप्पण्या