मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. असे म्हटले होते. तसेच मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या विधानावर मनोज जरांगे यांनी हल्लाबोल करताना म्हटले की,. राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला?, आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला? तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझं पोरगं त्याने पाडलं. तरी तू त्याची री ओढतो. राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंवर केला होता.

0 टिप्पण्या