Top Post Ad

"समस्त महाजन"ने केली पर्यावरणपूरक गाईच्या शेणापासून गणेश मूर्तीची निर्मिती

समस्त महाजन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक अशा गाईच्या शेणापासून  गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. ही भारतीय परंपरा, शाश्वतता आणि आत्मनिर्भर भारताशी जोडली गेली आहे. शंभरटक्के स्थानीय कारीगर, स्थानीय सामग्री, प्रदूषण-मुक्त और जैव-अपघटनीय- प्लास्टर अ़ॉफ पॅरिस नाहीं, कोणतेही रसायन नहीं, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शुद्ध तसेच  भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने अशा प्रकारच्या मुर्तीचे निर्माण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर स्वास्थ्य आणि नदी तसेच समुद्राच्या पाण्याला स्वच्छ करणाऱ्या या मुर्तीचे सर्वत्र स्वागत होत असून अहमदाबाद नगर पालिकेच्या वतीने सुमारे 10 हजार मुर्तींचे वाटप करण्यात आल्याची माहिती गिरीश जयंतीलाल शहा यांनी आज मुंबई प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांना दिली. 

यावर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली असून त्याचे सांस्कृतिक आणि ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या निर्णयाचे समस्त महाजन अभिमानाने स्वागत करत आहे आणि पर्यावरणपूरक गोमय (गाईच्या शेणाच्या) गणेश मूर्तीना प्रोत्साहन देत आहे जे भारतीय परंपरा, शाश्वतता आणि आत्मनिर्भर भारताशी जोडलेले आहे.  गणेशाची पूजा अशी करूया जी संस्कृती व निसर्ग दोन्हीला सन्मान देते. गोमय गणेश ही केवळ मूर्ती नाही तर पर्यावरण-जागृती, सांस्कृतिक अभिमान व आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. जर संपूर्ण भारताने हे स्वीकारले तर नद्या व समुद्र प्रदूषणापासून वाचतील, हजारो ग्रामीण कारागीर व गौशाला सशक्त होतील, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या पूजेची परंपरा पुनर्जीवित होईल असा आशावादही शहा यांनी व्यक्त केला. आपली भक्ती शाश्वतता आणि आत्मनिर्भर भारताच्या आंदोलनात रूपांतरित होईल याकरिता  मुंबई महाराष्ट्रासह भारतातील सर्व नागरिकांना या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गोमय गणेश मूर्ती स्वीकारण्याचे आवाहन केले, 

समस्त महाजन या संस्थेबाबत माहिती देताना शाह म्हणाले,  ही 2002 मध्ये स्थापन झालेली एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. प्राणी कल्याण, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास आणि मानवसेवा यासाठी कार्यरत असलेली ही संस्था करुणा, शाश्वतता आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारित आहे. आज समस्त महाजन संपूर्ण भारतात गौशाला, पांजरापोल, शासन व समाज यांचे विश्वसनीय सहकार्य बनले आहे. विविध राज्यांतील 1,200 हून अधिक गौशाला व पांजरापोलांना मदत. आतापर्यंत 15 अत्याधुनिक सुसज्ज मोबाइल व्हेटरिनरी अँब्युलन्स ("करुणा रथ") मार्फत 1,00,000 पेक्षा अधिक प्राण्यांना विनामूल्य आपत्कालीन उपचार. 1,50,000+ एकर बंजर जमिनीला सुपीक चारागाहांमध्ये रूपांतरित केले. 

दुष्काळ व संकटाच्या काळात चारा व पाणी पुरवठा. 900+ तलाव, नाला व नद्या पुनर्जीवित करून 900 पेक्षा अधिक गावांतील पाण्याची समस्या सोडवली. पावसाचे पाणी साठवण व वृक्षारोपणाद्वारे हवामान-तगडे मॉडेल तयार केले.  स्थानिक वृक्षारोपणः प्रत्येक गावात 4,000 स्थानिक वृक्षांचे राष्ट्रीय अभियान, ज्यामुळे जैवविविधता, आयुर्वेदिक पर्यावरण आणि सांस्कृतिक मुळे मजबूत होतात. व्याजमुक्त कर्ज योजनेतून 174 रिक्षा व 15 टॅक्सी गरजू कुटुंबांना देऊन आत्मनिर्भरता व मासिक उत्पन्नाची स्थिरता निर्माण केली. समस्त महाजनचे कार्य BSE Sammaan, NITI Aayog, TISS व IICA यांनी मान्य केलेल्या शाश्वत विकासाशी सुसंगत आहे. संस्था CSR मान्यताप्राप्त, FCRA प्रमाणित असून 80G व 12AA कर सवलत उपलब्ध करून देते. अशा प्रकारे संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही शाह म्हणाले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com