Top Post Ad

विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुरक्षित व सक्षम व्यवस्था करावी... अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाची मागणी

 सार्वजनिक गणेशोत्सवाला यावर्षी १३३ वर्ष पूर्ण होत आहेत.  सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे.  यामुळे आता गणेशोत्सवा संदर्भात येणाऱ्या पर्यावरण विषयक आदि अडचणी तर दूर होणारच आहेत पण शासनाकडून त्यासाठी पायाभूत सेवा सुविधा साठीचा निधी देखील मिळू शकणार आहे. या उत्सवात जवळपास १०,००० कोटीची उलाढाल होत असते.  महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यापैकी १२ हजार मंडळे मुंबईत आहेत. बुधवार दि. २७ ऑगस्ट  ते शनिवार दि. ६ सप्टेंबर  या कालावधीत राज्यात गणेशोत्सव संपन्न होत आहे  महापालिकेकडून ‘वन विंडो योजना’ अंतर्गत सर्व परवानग्या ऑनलाइन-ऑफलाइन उपलब्ध कराव्यात, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुरक्षित व सक्षम व्यवस्था करावी, गिरगाव चौपाटी व पवईसह प्रमुख ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट व योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, लालबागचा राजा व जीएसबी मंडळात देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय व्हावी यासह इतर मागण्यांचे निवेदन शासनाला दिले असल्याची  माहिती अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष सुरेश सरनोबत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली .यावेळी प्रमुख कार्यवाह प्रवीण आवारी, हरिश्चंद्र अहिर, आत्माराम म्हात्रे, विवेक भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महासंघाकडून गणेशोत्सव काळात शासनाकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ज्यामध्ये  १) महानगर पालिकेकडून मंडळांना मंडपाची परवानगी कृत्रिम तलाव व विसर्जन स्थळे, तेथील स्वच्छता विसर्जनासाठी क्रेन, निर्माल याची व्यवस्था रस्त्यावरील खड्डे गिरगांव चौपाटीवर १०० ते २०० लोखंडी प्लेट टाकण्यात येतात. २) पोलीस, वाहतूक पोलीस, बी. इ.एस.टी. आदानी, महावितरण यांच्याकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मदत योग्य ते लाइटचे दर आकारण्यात यावेत. बी.इ.एस.टी. ने एक खिडकी योजने अंतर्गत दक्षिण मुंबईतील मंडळांना वीज पुरवठा करावा व मीटर लावण्यासाठी घेतलेले डिपॉजीत महिनाभरात परत करावे ३) शासनाकडून स्पीकरची परवानगी उत्सव काळात ४ दिवस १२ वाजेपर्यंत वाढवून मिळते ती आणखी दोन दिवस वाढवून मिळावी. ४) मुंबईत एम्. एम्. आर.डी. मेट्रो ब्रिज यांची कामे चालू असल्यामुळे मिरवणूका जाताना अडचण निर्माण होऊ नये. ५) गिरगांव चौपाटी व पवई तलाव हे मुंबईतील सर्वात मोठी विसर्जनाची स्थळे आहेत तेथे योग्य त्या सुविधा असाव्यात.

६) लालबागचा राजा व जी. एस्. बी. गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील सर्वात मोठी मंडळे आहेत. त्या ठिकाणी भारतातून गणेश भक्त येतात. परदेशातून ही गणेशभक्त येत असतात त्या ठिकाणी शेजारील मैदानात गाडयांची पार्कीगची व्यवस्था महानगर पालिकेने करावी. ७) मंडळांच्या मोठ्या गणपतीची मूर्ति ज्या स्तोत्रात, समुद्रात विसर्जन करणार त्याच मंडळाची पूजेची मूर्ति देखील विसर्जन करण्याची परवानगी असावी. ८) मुंबईत भरणारे आठवडा बाजार महापालिकेने उत्सव काळात बंद ठेवावेत. ९) मत्स्य व बंदर विभागाकडून गिरगाव चौपाटीवर १० फुटाच्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात यावी. पालिकेने नेमलेले वेंडर बोटींचा योग्य तो पुरवठा करत नाही व पैशाची मागणी मंडळांकडून करतात. १०) ज्या मंडळांना आमदार खासदार फंडातून वास्तू बांधून दिल्या आहेत व तेथे मंडळ वर्षभर उपक्रम राबवून शासनाला व तेथील जनतेला मदत करत आहेत. उदा. मेडिकल सेंटर, फिजियोथेरपी सेंटर, प्यायाम शाळा, बालवाडया, डायलेसीस सेंटर असतील तर त्या जागा म्हाडा, कलेक्टर, महापालिका यांनी त्या मंडळांना योग्य ते दर लावून कनव्हेन्स करून दयाव्यात

११) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना वर्षभर सामावून घ्यावे, केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायदा दाखवू नये. १२) पूर्व उपनगरात डम्पींग ग्राऊंडमुळे वर्षभर नागरिकांना दुर्घधीयुक्त श्वास घ्यावा लागत आहे तो किमान गणेशोत्सव काळात घ्यायला लागू नये.-,१३)  सिध्दविनायक मंदिर न्यास प्रभादेवी यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपात लावण्यासाठी भगवे झेंडे लावण्याची व्यवस्था करावी. १४) ज्या मंडळांना मोठ्या मूर्त्या विसर्जन करावयाच्या नसतील त्यांना त्या मूर्त्या योग्य त्या ठिकाणी ठेवण्याची परवानगी मिळावी. १५)  प्रत्येक मंडळात १० गणसेवक तयार झाले तर मुंबईत १,२०,००० एक लाख वीस हजार गणसेवक तयार होतील त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनने सहकार्य करावे. १६) गणेशोत्सव काळात मोर्चे, आंदोलने करण्यास परवानगी देऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com