फडणवीस ज्या मतदारसंघातून उभे राहतात, तिचे नाव आहे नागपूर दक्षिण पश्चिम.The wire ने अभ्यास करून काही जबरदस्त Fact जनतेच्या समोर आणले आहे .वायर च्या म्हणण्यानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 29,219 मते वाढली. म्हणजे दोन्ही निवडणुकींच्या दरम्यान जो 5 महिन्यांचा कालावधी होता,त्या दरम्यान कालावधीत एकूण 8.25% मतदार वाढले.रोजची 194 मते वाढली.आता इथ 8.25% हा आकडा महत्त्वाचा.
निवडणूक आयोगाने या मतदार संघात कशी माती खाल्ली आहे ,हे आपण बघूया. निवडणुक आयोगाच्याच नियमानुसार, जर एखाद्या मतदारसंघात 4% पेक्षा जास्ती मतदार वाढले तर त्याची पुनर्तपासणी करणे गरजेचे असते/त्याबद्दल काँग्निझंस घेऊन उचित कारवाई करणे अपेक्षित असते.
पण निवडणूक आयोगाने यातील कोणतीच गोष्ट केली नाही.आता इथ काही तटस्थ बोड्याचा आव आणणारे म्हणतील की,"मग काँग्रेस काय करत होती..?".तर वाट चुकलेल्या बिंदानो,काँग्रेसने तिथे अनेक वेळा तक्रार दाखल केल्या.निवडणूक आयोगाला जाब विचारला.फडणवीसांच्या विरोधात उभा असणारे काँग्रेसचे उमेदवार अगदी आजही निवडणूक आयोगाकडे जाब विचारत आहेतं.कोर्टात गेले आहेत.
तर मूळ मुद्दा होता,
4% पेक्षा जास्त मतदार वाढीचा.फडणवीस यांच्या मतदारसंघात एकूण 378 बूथ आहेत.त्यापैकी 263 बुथवर 4% पेक्षा जास्ती वाढ आहे.तर 26 बुथवर तब्बल 20% पेक्षा जास्ती मतदार वाढ झाली आहे.आणि 4 बूथ तर असे आहेत की,40% पेक्षा जास्त मतदार वाढ झाली आहे.
आता यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली?
तर शून्य.
कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या, जो पुढे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणार होता त्या माणसाच्या विरोधात निवडणूक आयोग काही कारवाई करेल अशी आशा धरणेच मुळात चूक.आता एक गोष्ट लक्षात घ्या,
निवडणूक आयोगाचे कपडे इतक्या ठिकाणी फाटले आहेत की,त्यांना त्याचं भोंगळेपणा लपवता येत नाहीये.आणि आता हे मोक्कार फाटतच जाणार आहे..
0 टिप्पण्या