ः राज्यभाषा मराठीच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी कार्यरत असणाऱया कोकण मराठी साहित्य परिषदेची ठाणे शहर शाखा विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे ठाणे शहरातील तसेच गावपाड्यातील शाळांमधून राबविण्यात येणारे ‘समृद्ध मराठी अभियान.' शहर कार्यकारिणीचे सहकार्यवाह पंकज पाडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 19 कार्यक्रम करण्यात आले असून ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वर्तकनगर येथील द. ल. मराठे विद्यालयात विसावा कार्यक्रम नुकताच करण्यात आला. विद्यार्थ्यांना मराठी म्हणी, वाक्रप्रचार आणि व्याकरणाविषयी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मराठी गाणी, कविता विद्यार्थ्यांकडूनच म्हणून घेतल्या जातात. मराठी शब्दखेळातून विद्यार्थ्यांची मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येतो.
पंकज पाडाळे यांनी मराठे विद्यालयातील विद्यार्थ्यांना लोककला, भारुड आदीविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना कवितेला चाल कशी लावावी, कवितेचा आनंद कसा घ्यावा, रसग्रहण कसे करावे याचे उदाहरणासहित मार्गदर्शन केले. फॅट टू फिट डान्स स्टुडिओचे विकास भोईटे, दीक्षा गौड, अमन बागबाने यांनी पाडाळे यांना सहकार्य केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मोहिते, शिक्षक विनिता फाटक, सुरेखा सुरवाडे, शारदा परदेशी, सुरेखा वावळ, मीनल घाडगे, आशा माने, सोनाली सावंत, योगिता बिरारी, मोहन पाटील, उमाकांत सोनवणे उपस्थित होते.

0 टिप्पण्या