Top Post Ad

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त धडधडीत खोटे बोललेत

 केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आजच्या प्रेसमध्ये धडधडीत खोटे बोललेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर लगेच कुणीही तक्रार का दाखल केली नाही. आता इतक्या उशिरा नंतर सदर निवडणूकी संदर्भात का बोलले जात आहे ? अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य होते. परंतु हा माणूस ढळढळीत खोटं बोलत होता.भाजपाची भाषा बोलत होता.एक नोकरशहा अशा अरवाच्च भाषेत, मग्रुरी भाषेत कसे काय बोलू शकतो ? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागल्या बरोबर आक्षेप घेतला होता. निवडणूकीचा निर्धारित वेळ संपल्यावर सायंकाळी 6 नंतर जे 76 लाख मतदान झाले त्या संबंधीत माहिती बाळासाहेब आंबेडकर यांनी मागीतली होती. अर्थात त्या त्या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांमार्फत प्रिसांडींग ऑफिसरकडे मागीतली होती .परंतु माहिती देण्यात आली नाही.

एवढेच नाही तर मुंबई उच्च न्यायालयात ह्या विषयाला अनुसरून याचिका दाखल केली होती.हायकोर्टाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडता सदर केस फेटाळून लावली हा भाग वेगळा. परंतु दरम्यान च्या काळात ज्या मोजक्या सुनावण्या झाल्यात त्या त्या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी अर्थात ते प्रतिवादी होते म्हणून कोर्टात हजर होते. मुंबई उच्च न्यायालयाने सदर केस फेटाळल्याने मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. उद्या दि 18.8.2025 रोजी प्रथम सुनावणी होत आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगला उद्या कोर्टात हजर राहावे म्हणून नोटीस देलेली असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आजच्या पत्रकार परिषदेत ठळठळीत खोटे बोलतात याचे नवल वाटले.
केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्तता असलेला आयोग आहे. या आयोगाने एका सत्ताधारी पक्षाची बाजू घेऊन बोलणे म्हणून संविधानाचा अपमान होय. परंतु अलिकडच्या काळात भाजप आरेसेसच्या केंद्रीय भाजप सरकारने सर्व स्वायत्त संस्थांना आपले गुलाम बनवले आहे. त्या मुळे स्वायत्त असूनही खऱ्याची भूमिका घ्यायला ह्या संस्था घाबरतात. परंतु लोकशाही जिवंत ठेवायची असल्याने निवडणूक आयोगाला आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आजच्या प्रेसमध्ये धडधडीत खोटे बोललेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर लगेच कुणीही तक्रार का दाखल केली नाही. आता इतक्या उशिरा नंतर सदर निवडणूकी संदर्भात का बोलले जात आहे ? अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य होते. परंतु हा माणूस ढळढळीत खोटं बोलत होता.भाजपाची भाषा बोलत होता.एक नोकरशहा अशा अरवाच्च भाषेत, मग्रुरी भाषेत कसे काय बोलू शकतो ?
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागल्या बरोबर आक्षेप घेतला होता.निवडणूकीचा निर्धारित वेळ संपल्यावर सायंकाळी 6 नंतर जे 76 लाख मतदान झाले त्या संबंधीत माहिती बाळासाहेब आंबेडकर यांनी मागीतली होती.अर्थात त्या त्या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांमार्फत प्रिसांडींग ऑफिसरकडे मागीतली होती.परंतु माहिती देण्यात आली नाही.
एवढेच नाही तर मुंबई उच्च न्यायालयात ह्या विषयाला अनुसरून याचिका दाखल केली होती.हायकोर्टाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडता सदर केस फेटाळून लावली हा भाग वेगळा. परंतु दरम्यान च्या काळात ज्या मोजक्या सुनावण्या झाल्यात त्या त्या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी अर्थात ते प्रतिवादी होते म्हणून कोर्टात हजर होते.
मुंबई उच्च न्यायालयाने सदर केस फेटाळल्याने मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. उद्या दि 18.8.2025 रोजी प्रथम सुनावणी होत आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगला उद्या कोर्टात हजर राहावे म्हणून नोटीस देलेली असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आजच्या पत्रकार परिषदेत ठळठळीत खोटे बोलतात याचे नवल वाटले. केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्तता असलेला आयोग आहे. या आयोगाने एका सत्ताधारी पक्षाची बाजू घेऊन बोलणे म्हणून संविधानाचा अपमान होय. परंतु अलिकडच्या काळात भाजप आरेसेसच्या केंद्रीय भाजप सरकारने सर्व स्वायत्त संस्थांना आपले गुलाम बनवले आहे. त्यामुळे स्वायत्त असूनही खऱ्याची भूमिका घ्यायला ह्या संस्था घाबरतात. असे असले तरी देशात न्याय व्यवस्था जिवंत आहे. न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात 76 लाख मतदानाचा हिशोब निवडणूक आयोगाने दिलाच पाहिजे कारण आयोगावरचा विश्वास उडत चाललेला आहे.
सुरेश रा शिरसाट, अकोला दि.17.8.2025



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com