Top Post Ad

पगारासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन

ठाणे महानगरपालिकेच्या परिसरातील सेप्टिक टाकी, मलवाहिनी, चैम्बर्स आदी चोखअप काढण मेसर्स. KAM -AViDA Enviro Engineers Pvt Ltd या ठेकेदार मार्फत मे महिन्यापासून काम सुरू असून सदर ठेकेदार यांनी कामगारांना मे, जून आणि जुलै या तीन महिन्याचे वेतन आज १२ ऑगस्ट पर्यंत अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अतिशय हाल झाले आहेत. घरात रेशन, औषधोपचार, मुलांच्या फी , घरभाडे, लाईटचे बिल आणि कर्जदार यांच्या तगादा मुळे कुटुंबीयांची बिकट परिस्थिती झाली आहे. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या कडून सात ऑगस्ट पर्यंत कामगारांना वेतन अदा करण्याच्या लिखित सूचना असताना देखील अद्यापही वेतन अदा करण्यात आले नाही. 

सदर प्रकरणी अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे साहेब यांच्या दालनात झालेल्या बैठकीत देखील या बाबतीत चर्चा करण्यात आली होती. उपनगर अभियंता (यांत्रिक)  गुणवंत झाम्ब्रे यांनी ठेकेदार आज वेतन अदा करेल, उद्या करेल अशी अनेकदा आश्वासने दिली. परंतु कामगारांना वेतन न मिळाल्याने आणि अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. आता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “स्वातंत्र्याचे झाले काय आणि आमच्या हाती आले काय ?” हाच अमृतकाल आहे का? असे प्रश्न कामगार विचारत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या आगोदर वेतन अदा न केल्यास दिनांक १८ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालय समोर हातात कटोरा घेऊन भीक मागो आंदोलन करणार. त्यासाठी ठेकेदार आणि महापालिका प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com