विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान डेटामध्ये फेरफार केल्याचा वारंवार आरोप केला आहे. पत्रकार परिषदेमार्फत हे सप्रमाण दाखवून दिले. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका भाजपला जिंकवण्यासाठी 'मत चोरी' करण्यात आल्याचे म्हटले या गोष्टीला सुमारे दहा दिवसाचा कालावधी झाल्यानंतर आता बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने आज 17 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेलेल्या किंवा वगळल्या गेलेल्या लोकांची नावे स्वाक्षरी केलेल्या घोषणापत्रासह सादर करण्यास सांगितले आहे. आयोगाने असेही म्हटले आहे की जर लोकसभेतील विरोधी पक्षनेते त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाहीत तर त्यांनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी.
बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार यांद्यांच्या पुनपरीक्षण प्रक्रियेवर आणि 'मत चोरी'च्या आरोपांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आयोगाने म्हटले की आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. कोणत्याही तक्रारीसाठी आयोगाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. मत चोरीसारख्या शब्दांचा वापर पूर्णपणे चुकीचा आहे, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती. ते म्हणाले की, मतदारांचे फोटो, नावे आणि ओळखपत्रे सार्वजनिकरित्या दाखवण्यात आली आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
यावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशलमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतांना म्हटले आहे की, , राहुल गांधी यांनी मतचोरी करून लोकशाहीची गळचेपी कशी होत आहे, याचे सत्य पुराव्यासह देशासमोर मांडलं. यानंतर भाजप आणि निवडणूक आयोगाची आपली कातडी वाचण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद ही प्रशासकीय कमी राजकीय जास्त होती. महाराष्ट्राच्या निवडणुकीत संध्याकाळी झालेले मतदानाबाबत सीसीटीव्हीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण त्यावर गजब उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिले. आई बहीण यांचे व्हिडिओ कसे द्यायचे असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडत असेल तर मतदान केंद्रावर बसवलेले सीसीटीव्ही काढून टाकले पाहिजे.
निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांची सोडा आज पत्रकारांच्या नेमक्या प्रश्नांची उत्तर नव्हती उलट निवडणूक आयोग पळवाटा शोधत आहे असच चित्र होत. बोल आयोग रहा था पर शब्द पार्टी ऑफिस से आये थे क्या? असा प्रश्न पडला! दुसरीकडे राहुलजी यांच्या व्होट अधिकार यात्रेच्या पहिल्या दिवशी आलेल्या जनसागराने एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे... जनतेच्या दरबारात मत चोरांना माफी नाही! मत चोरुन सत्तेत बसलेल्या भाजप सरकारला खाली खेचल्या शिवाय जनता आता शांत बसणार नाही. एक व्यक्ती, एक मत आपल्या संविधानाचा पाया आहे. नागरिकांचा हा अधिकार शाबूत राखण्याची सर्वस्व जवाबदारी निवडणूक आयोगाची आहे, पण दुर्दैवाने ते तसं करताना दिसत नाही आहेत. आम्ही संविधानाचे रक्षक आहोत. प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार अबाधित रहावा म्हणून आमचा संघर्ष सुरूच राहील असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या