गेल्या नऊ वर्षांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली दि बेस्ट एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटीची निवडणूक उदया होत आहे .अंतर्गत फाटाफूटी नंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने दोन्ही गटांसाठी ती अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे .त्यामुळे बेस्ट कामगारांच्या या पतसंस्थेवर कुणाचं वर्चस्व राहील . हा प्रश्न कायम आहे .कामगारांच्या हिताला हरताळ फासून केवळ अर्थार्जनासाठी सोसायटीचे चेअरमन कीर्तन कोरी हे संचालक संजय भगरे, लहू पवार ,शहाजी मगरे शैलेश मोहिते आणि बाबू सुलम यांना सोबत घेऊन बाहेर पडले .त्यांना बंडखोरी करण्यास भाग पडल्याचा आरोप कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी केला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी संजय घाडीगांवकर यांनी अजित बने व संध्या चव्हाण यांना सोसायटीच्या कारभारात सामावून घेतले. त्यासाठी त्यांनी बेस्ट वर्कर्स युनियनशी काडीमोड घेतली .
दरम्यान संजय घाडीगांवकर यांनी सत्ता आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर आपल्या काकांना दी इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी आणले. साधारपणे २००५ ते २०१५ या कालावधीत बेस्ट कामगारांच्या ह्या पतसंस्थेत बदल घडत गेला. या कालावधीत कार्यरत असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकारी कम पतसंस्थेच्या संचालकांनी महाबळेश्वर येथील हॉलिडे रिसॉर्ट बांधण्यास आवश्यक असलेल्या भूखंड खरेदीसाठी पंचवीस लाख रुपये एका दलालास दिले त्याचे काय झाले ? असा सवाल उपस्थित करून ह्या व्यवहाराचा हिशोब भ्रष्ट संचालकांनी द्यावा अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे. २०१६ मध्ये झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी तीन संघटनांनी मिळून उत्कर्ष पॅनल स्थापण्यात यश संपादन केले .त्या १६ उमेदवारांमध्ये शशांक राव यंच्या संघटनेच्या तीन उमेदवारांनी विजय हशील केला होता. पण सत्ता स्थापनेनंतर अनिल कोकीळ नामक एक संचालक महानगर पालिकेच्या निवडणुकीत उतरले .त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन संचालक निवडीसाठी सहकार कायद्याप्रमाणे निवडणूक होणे अपेक्षित होते .पण तसे झाले नाही. कायदा धाब्यावर बसवून काकांनी आपल्या मर्जीतील माणसे त्या जागेवर नियुक्त केली असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. संजय घाडीगांवकर यांनी कीर्तन कोरी उर्फ काका यांना इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष बहाल केले त्याचा गैरफायदा घेत या मंडळींनी आर्थिक विकास करण्याऐवजी पैशांची आफरा तफर केली असून हॉलिडे रिसॉर्टच्या नावाखाली सहा बंगले खरेदी केले. बोरिवली येथील कार्यालयाची खरेदीत गैरव्यवहार झाला असून मुंबई शहरासह उपनगरातील कचेऱ्यांची डागडुजीचे काम आपल्या मर्जीतल्या लोकांना दिल्याचा आरोप करत बेस्ट कामगारांची पत संस्था वाचविण्याचे आवाहन विठ्ठलराव गायकवाड यांनी कामगारांना केले आहे .
जॉन मेढे (मुंबई)

0 टिप्पण्या