मात्र शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी पक्ष भाजपाचे स्थानिक आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी यावेळी अनुपस्थित असल्याने हा कार्यक्रम शिवसेनेच्या शिंदे गटाने हायजॅक केला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. नुकत्याच झालेल्या नारळीपौर्णिमा उत्सवाच्यावेळी कळवा नाका येथे झालेल्या कार्यक्रमात देखील स्थानिक नगरसेवकांना डावलण्यात आले होते. आणि आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत देखील स्थानिक आमदारांना डावलण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता.
ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत आहे. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची’असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी आहे. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्पर्धेचा निकाल
पुरुष खुला गट - अंतर २१ किमी १. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे २. अंकुश हक्के, सांगली ३. कमलाकर देशमुख, नाशिक ४. बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे ५. सचिन यादव, मुंबई उपनगर ६. राज तिवारी, मुंबई ७. इश्वर झिरवाल, नाशिक ८. धुलदेव घागरे, सांगली ९. अमोल अमुने, सोलापूर १०. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी
महिला खुला गट - अंतर २१ किमी १. रविना गायकवाड, नाशिक २. आरती पवार, नाशिक ३. साक्षी जड्याल, रत्नागिरी ४. ऐश्वर्या खलाडकर, पुणे ५. रुक्मिणी भोरे, पालघर ६. अभिलाषा मोडेकर, पुणे ७. प्रियांका पैकाराव, ठाणे ८. प्रतिक्षा चोरमले, मुंबई ९. आंचल मारवा, मुंबई १०. उर्मिला बने, मुंबई
पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी १. चैतन्य रुपनेर, सांगली २. अतुल बरडे, नाशिक ३. वैभव शिंदे, नाशिक ४. आशुतोष यादव, मुंबई ५. प्रतिक डांगरे, पालघर ६. मन्नू सिंग, ठाणे ७. हितेश शिंदे, मुंबई ८. हर्षा चौहान, मुंबई ९. दत्ता आढाव, परभणी १०. सूरज झोरे, सातारा
महिला, १६ वर्षावरील, १० किमी १. साक्षी भंडारी, अहिल्यानगर २. मानसी यादव, पुणे ३. रिनकी पवार, नाशिक ४. शेवंता पवार, धुळे ५. आरती भगत, नागपूर ६. मोनिका सिंग, मुंबई ७. प्रियांका कुपते ८. आदिती पाटील, ठाणे ९. प्रियांका देवरे, नाशिक १०. जयश्री कुंजरा, पालघर
मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी १. आशिष राजबर २. रुद्र घाडगे ३. कयान चव्हाण ४. ओंकार भट ५. सर्वेश लावंड ६. आयान पिंजारी ७. आर्यन वेखंडे ८. हर्षवर्धन सुर्वे ९. रोहीत राठोड १०. प्रतिक खानसोळे
मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी १. अल्येस लोपेझ २. अल्विना मॅट्स ३. श्रेया ओझा ४. जस्लीन शैजू ५. भक्ती कदम ६. बुर्शा शेख ७. मानसी कांबळे ८. नेहा हलगरे ९. वंशिका जंगम १०. प्रिती शहा
मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी १. आराध्य पाटील २. रिधम साईल ३. पवन वर्मा ४. तेजप्रताप कुमार ५. जेकब मेयन ६. दक्ष दळवी ७. सार्थक यादव ८. अयन पांडे ९. मारुती वर्मा १०. अर्णव अडसुळ
मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी १. ओवी पाटील २. जान्हवी गुंजाळ ३. अभिगेल गॅरजल ४. आहाना निरंकारी ५. रिया गोसावी ६. तन्मयी भोईर ७. स्तुती फातर्फेकर ८. अद्विका घोळे ९. अनन्या प्रसाद १०. अनघा भोईर
पुरुष - ६० वर्षांवरील, ०१ किमी १. नारायण कंदमवार २. सुधाकर शिंदे ३. एकनाथ पाटील ४. अशोक भोगले ५. पुनाजी सातव
महिला - ६० वर्षांवरील, ०१ किमी १. आशा पाटील २. रेखा ताम्हाणेकर ३. प्राची वाघ ४. शुभांगी भोगले ५. साधना दलाल
कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी १. दिलीप शिंदे २. प्रकाश साईल ३. स्मिता काजवे ४. हर्षल पाटील ५. श्रीकांत आंबाडे



0 टिप्पण्या