दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला भविष्यात लागणारी मदत किंवा अर्थपुरवठा नव्हे तर कामगारांसाठी लाभाच्या योजना या जिल्हा बँकेच्या मदतीने नक्कीच करू असे आश्वासन आज आमदार प्रविण दरेकर यांनी दिले. दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५- २०३० ही पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ सादर करण्यात आलेला सहकार समृद्धी पॅनलचा जाहीरनामा आज दरेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दरेकर पुढे म्हणाले, वेगवेगळ्या सवलती, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या योजना, त्यांच्या आरोग्याच्या योजना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या योजना, निवृत्तीनंतरच्या योजना या पतसंस्था आणि जिल्हा बँक अशी एकत्रीतपणे कार्य करता येऊ शकेल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही ताकद या सोसायटीला लागेल ती ताकद प्रसंगी नियमांना शिथील करून कर्मचाऱ्यांकरिता भविष्यात निर्माण करण्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले. बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी माझा जवळचा संबंध आहे. २५-३० वर्ष बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेला ताकद देणे, मदत करण्याचे काम अविरहितपणे केलेय. परंतु ज्या पद्धतीने समृद्धी सर्वसामान्य सभासदांच्या जीवनात येण्याची गरज होती अशा प्रकारचे कुठलेही भरीव काम ज्यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था होती ते करू शकले न जिल्हा बँक ही या पतसंस्थेची पालक बँक आहे. या बँकेला लागणारा अर्थपूरवठा करणारी संस्था आम्ही आहोत. पतसंस्थेला ताकद देण्याचे काम आम्ही करू. असे आश्वासन दरेकर यांनी दिले.
यावेळी ‘सहकार समृध्दी पॅनेल’ विजय मिळवेल, म्हणजेच सत्याचा विजय होईल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. येत्या १८ ऑगस्ट रोजी दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक होणार असून समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन एकत्र येऊन हे पॅनेल उभे केले आहे. ही निवडणूक पक्षीय नसून सहकार क्षेत्र व संस्थेच्या संरक्षण-विकासासाठी आहे. “संस्था टिकली तरच सहकार टिकेल” या भूमिकेतून आम्ही काम करतो, असे ते म्हणाले. त्यांनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना लोणावळ्यात बंगले खरेदी, मुंबई बँकेकडून निधी मिळवणे आणि बेस्ट विक्रीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. कार्यकर्त्यांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना ७०० हून अधिक नैमित्तिक बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवणे, कोविड भत्ता मिळवून देणे, तसेच १२ महत्त्वाचे विषय मार्गी लावल्याचे सांगितले. ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. बेस्ट ला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत. असे ते म्हणाले.
"दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत सर्व समाजघटकांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन काम करत असताना, संस्थेचे संरक्षण व विकास हा आमचा एकमेव हेतू आहे. "मुंबई महापालिकेत जसा भ्रष्टाचार झाला, तसाच भ्रष्टाचार विरोधकांनी बेस्ट पतसंस्थेतही केला आहे. लोणावळ्यात स्वतःच्या स्वार्थासाठी बंगले घेतले गेले, मुंबै बँकेकडून युनियनला निधी देखील देण्यात आला. BEST विकायला काढण्याचा प्रयत्न झाला, आणि आज ती ३००० कोटींनी बुडीत आहे. आम्ही त्यासाठी पर्याय सुचवले आहेत-डेपो न विकता भाड्यावर देणे यासह इतर उपाययोजना आम्ही मांडल्या आहेत." "७०० पेक्षा जास्त नैमितिक BEST कामगारांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला, कोविडचा भता मिळवून दिला, BEST कर्मचान्यांचे १२ महत्वाचे विषय सोडवले. "ही निवडणूक आम्ही जनतेच्या विश्वासावर जिंकू, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला तसेच 'सहकार समृध्दी पॅनेल च्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

0 टिप्पण्या