Top Post Ad

25,000 कोर्टीचा कुर्ला मदर डेअरी भूखंड घोटाळा विरोधात निवेदन पदयात्रेला पोलिसांनी अडवले

मुंबईच्या मध्यवर्ती भागात घडत असलेल्या अत्यंत गंभीर आणि हजारो कोटींचा शहरी भूखंड घोटाळा होत आहे. सुमारे 25,000 कोटी किमतीचा 21 एकर भूखंड केवळ 57 कोटींना "धारावी पुनर्विकास प्रकल्पा" अंतर्गत अडाणी प्रॉपर्टीजला देण्यात आला आहे. या भूखंडाचे वाटप रद्द करणे, उद्यान आरक्षित करणे व कुर्ला (पूर्व) मधील नागरी प्रश्न सोडवणे इत्यादी मागण्यांसह धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीचा 21 एकर भूखंड बेकायदेशीरपणे हस्तांतर,  30 ते 40 वर्षे जुनी हजारो प्रौढ झाडांची प्रस्तावित तोड या विरोधात लोक चळवळ - कुर्ला नागरिकांनी पुढाकार घेऊन कुर्ला मदर डेअरी ते वर्षा मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब करीत सर्व आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये ठेवले. त्यांना नोटीसा देऊन त्यांना सोडण्यात आल्याची माहीत आंदोलनकर्त्यांनी दिली. यामध्ये  माजी आमदार शिवसेना बाबुराव माने साहेब, शेकाप राजू कोरडे, सीपीआयचे नसीरुल हक, राष्ट्रवादी-सपाचे उलेश गजकोश, सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवराम कासारे यांचा समावेश होता.  


७ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता, कुर्ल्यातील नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी कुर्ला मदर डेअरी येथून निवेदन पदयात्रा सुरू केली. ते पुढे जाताच, नेहरू नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या वाहनातून थेट आझाद मैदानावर सोडले. धारावी बचाओ आंदोलनाचे नेते आणि कार्यकर्ते निवेदन यात्रेचे स्वागत करण्यासाठी शिवसेना शाखा १८४ सायन स्टेशनवर जमले होते, परंतु तिथे धारावी पोलिसांनी धारावी बचाओ आंदोलनाचे सर्व आयोजकांना ताब्यात घेतले. जिथे त्यांना २ तास बसवून आणि सूचना देऊन सोडण्यात आले, तेथून ते आझाद मैदान यात्रेत सामील होण्यासाठी गेले. 
 डीआरपीच्या नावाखाली धारावी व्यतिरिक्त मुंबईतील सुमारे १५०० एकर जमीन अदानीं बिल्डरला देण्यात आली आहे, 

या जमिनीवर धारावीच्या लोकांना टाकले जाण्याची शक्यता आजही धारावीकर व्यक्त करत आहे. कारण कुठलाही ठोस विकास आराखडा अडानी बिल्डरकडून धारावीकरांना दिला जात नाही. या विरोधात अडानी हटाव धारावी बचाव आंदोलन जोर धरू लागले आहे.  आता धारावी बचाव आंदोलनासोबत मुंबई बचाव समिती देखील सहभागी झाली आहे.  मुंबई आणि धारावीच्या पुनर्वसनाच्या जमिनीबाबत चर्चा करण्यासाठी आणि मागण्यांचे निवेदन देण्याकरिता आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विनंती पत्र दिले होते, परंतु मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. या मुळे आक्रमक झालेले मुंबईकर मदर डेअरी कुर्ला पूर्वेकडून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यापर्यंत निवेदन पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

 सरकार अदानीसाठी सर्व नियम डावलून मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी शून्य भावात देत आहे. कुर्ल्याची मदर डेअरी, मिठागरे, मुलुंड, देवनार डंपिंग ग्राऊंड, बांद्रा येथील जमिनी दिल्या आहेत. या भू माफियासाठी भाजपाचे सरकार पायघड्या घालत आहेत, अदानीसाठी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणविसांना फोन करतात व फडणवीस लगेच सरंडर होतात. या भू माफियाची जमिनीची भूक काही संपत नाही. मुंबईतील सर्वच जागा या लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा कुटील डाव भाजपा सरकारचा आहे. मुंबई ही कोळी, आगरी, गिरणी कामगार, कष्टकरी यांची आहे. मुंबईवर या भूमिपुत्रांचा पहिला अधिकार आहे पण भाजपा जाणिवपूर्वक एका उद्योगपतीसाठी या स्थानिकांना विस्थापित करत आहे, हा प्रकार मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत मुंबईला हात लावू देणार नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली धारावीकरंना विस्थापित करत आहे. धारावीकरांना मुलुंड, डंपिंग ग्राऊंड, मीठागरे याठीकाणी घरे देण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. धारावीत अदानीचे टॉवर उभे करून स्थानिकांना दुसरीकडे पाठवण्याचा डाव आहे पण धारावीकरांना धारावीतच घरे दिली पाहिजेत, मुलुंड अथवा इतर कोणत्याही जागी धारावीतील एकही कुटुंब स्थलांतर करणार नाही अशी ठाम भूमिका धारावीकरानी घेतलीं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com