सांस्कृतिक आणि धम्म कार्यात अग्रेसर असलेल्या वांद्रे पूर्व येथील शिल्पकार महिला संघातर्फे रविवारी दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद जाजू, शिवसेना स्थानिक नेते, विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून वांद्रे पूर्व सिद्धार्थनगर (ब) येथील शिल्पकार महिला संघाने रविवारी ( दि.१३) संध्याकाळी येथील प्रबोधनकार ठाकरे समाजमंदिरात सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अदिती पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते राजू पगारे, राजकीय पत्रकार श्रीकांत जाधव यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.मयुरी मोहिते यांनी सूत्रसंचालन तर प्रज्ञा हंकारे यांनी आभार प्रदर्शन केले. संघमित्रा मयेकर, सीमा पगारे, विमल हंकारे, माधुरी कांबळे, माधुरी हंकारे, संजना हंकारे, शैला माने, प्रिया कांबळे, वर्षा हंकारे, अदिती जाधव, सोनाली जांबुगेकर, मदन हंकारे, संदीप हंकारे, विलास कदम, इंद्रजीत मोहिते, रघुवीर एलडी, प्रकाश हंकारे, विजय मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी समूह गायन, भाषणे करून आपल्या कला सादर केल्या. यावेळी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.


0 टिप्पण्या