Top Post Ad

.ही पिल्लावळ आता ठेचून काढायला हवी ...हर्षवर्धन सपकाळ

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन थेट हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला. या घटनेमुळे काही काळ पुणे स्टेशन परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होत. पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरज शुक्लाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने पुतळ्याचे अधिक नुकसान टळले आहे. 

 याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून तो काही दिवसांपासून पुण्यात नोकरीच्या शोधात राहत होता. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या उद्देशाने केले, त्याचा कोणत्याही संघटनेशी संबंध आहे का, त्याची मानसिक स्थिती काय आहे. याचा तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यावर असा हल्ला होणे हे गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांत संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे.  पुण्यात नुकताच बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि नंतर गांधींवर हल्ला होणे म्हणजे पेशवाई पुन्हा येत आहे का अशी चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे.

 गांधीजींच्या पुतळ्यावरील हल्ला नाही तर तो देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे .संघ परिवार आणि भाजपने पसरविल्या द्वेषाची ही फळं आहेत.  ही विष वल्ली वेळीच ठेचायला हवी अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे .अध्यक्ष हर्वर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. त्यांनी  या  घटनेचा तीव्र निषेध केला आहे.  महात्मा गांधी हे केवळ  स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे नेते नाहीत. तर भारताच्या नैतिक अधिष्ठानाचे शिल्पकार आहेत.गांधीजींनी घालून दिलेल्या सत्य अहिंसा,धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकता या  मूल्यांवर आधारित आपली लोकशाही उभी आहे. .असे सांगून सपकाळ पुढे म्हणाले ,आज संपूर्ण जगाने गांधीचे विचार आचरणात आणले. विचारांसह आज देश विदेशात गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे पुतळे उभे आहेत .सरकारी छत्रछायेखाली   वाढणाऱ्या ह्या विषवल्ली गोडसेचे  उत्तदिकरण करू पाहत आहेत .ही पिल्लावळ आता ठेचून काढायला हवी अशा शब्दात सपकाळ यांनी आपल्या भावना  व्यक्त करून शुक्ला सारख्या   माथेफिरुवर  UAPA  अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.गांधीजींची हत्या  केली गेली मात्र गांधीविचार  संपवून दाखवा .असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हंटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com