Top Post Ad

सगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी ताकदीचं नियोजन करून लढलं पाहिजे


 मराठी भाषेचे लढे आणि मराठी माणसांचे जगण्याचे लढे परस्परांपासून वेगळे करणं सोयीचं वाटलं तर अंतिमत:धोक्याचं आहे.गेल्या दोन महिन्यात तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे उफाळून आलेला मराठी माणसांचा राग मराठी माणसांच्या आर्थिक,सांस्कृतिक ,राजकीय परीघीकरणापर्यंत नेणे आणि त्यातून व्यापक महाराष्ट्रधर्मावर आधारित मराठीकारण उभे करणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी आजच्या महाराष्ट्रापुढचे कळीचे प्रश्न -जनसुरक्षा कायदा,शक्तिपीठ मार्ग,वाढवण बंदर,ग्रोथ हब ,एमएमआरच्या वेगळ्या राजाची शक्यता,उत्तर भारतीयांच्या बेसुमा्र आयातीमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणे आणि उत्तर भारताच्या प्रतिगामी हिंदुत्व आणि इस्लामची महाराष्ट्राला लागण होणे, गुजर मारवाड्यांनी विशेषत:जैनांनी अपार पैशामुळे चालवलेला सांस्कृतिक उन्माद या सगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी ताकदीचं नियोजन करून लढलं पाहिजे.

हा संयुक्त महाराष्ट्र २.० चा लढा आहे.१९५६,१९६६ ,२००६ च्या चुका सुधारून लढलो तर यश अशक्य नाही. महाराष्ट्र आपला मानणाऱ्या प्रत्येकाचं हे मराठीकारण आहे. संघ भाजपच्या एकसाची राष्ट्रवादाला उत्तर देणा्रं हे महाराष्ट्रधर्माचं कथन आहे. त्या पायावर लढून जिंकूया नक्षलवादी हा व्यवस्थेला धोका आहेच.पण उजवे धर्मांध आणि मूलतत्ववादी तर व्यवस्थाच होऊन बसले आहेत.घटनेचं वेष्टन मखरात ठेवून आतला आशय बदलण्याचं पुण्यकर्म करण्यासाठी ते संधींची वाट पाहत आहेत. शाळा, कॉलेजं, विद्यापीठं, वाचनालयं. व्याख्यानमाला, दिंड्या सगळं यांनू पोखरून टाकलंय.
पण हे लोक इतके घाबरट आणि खुनशी आहेत की यांना विरोधाची तिरीपही सहन होत नाही.
मविआवाल्यांनी विरोध केला असेल, पण हे विधेयक पेटवून देण्याच्या लायकीचं आहे.ते केलंय का?
डावे आज जात्यात आहेत. मराठीचे लढे उभारणारे, शक्तिपीठवाले, पर्यावरणवादी सुपात आहेत.
आपला पण नंबर लवकरच येणार आहे.
विधिमंडळातले टोणगे टुणकन भाजपच्या कुशीत जाऊन बसतील. तडजोड न करणारे खितपत पडतील, त्यांची वाताहत होईल. हे गृहित धरूनच सपोर्ट सिस्टम उभी करायला पाहिजे. अघोषित आणीबाणी कितीही काळ चालू शकते. राष्ट्रवाद,भाषिक ओळख या सगळ्याची फेरमांडणी करण्याचा हा पथदर्शी काळ आहे. या काळात आपण टिकले तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं काहीतरी उभं राहण्याची शक्यता जिवंत राहील....करून पाहू..... पाहून करू.
जय मराठी ! जय महाराष्ट्र
----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com