रामदास आठवले व बाळ ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर "शिवशक्ती भिमशक्तीच्या" प्रयोगाची घोषणा एकेकाळी केली होती..पण दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले..बाळ ठाकरे यांचे २०१२ ला निधन झाले व शिवसेनेची सुत्रे ऊध्दव ठाकरे यांच्याकडे आली.. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बिजेपी व शिवसेनेची युती तुटली.. यावेळी ऊध्दव ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रामदास आठवले यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले... रामदास आठवले यांच्या अवस्था "ना घरका ना घाट का" अशी झाली असताना त्यांनी बिजेपीसोबत संधान साधून संधी साधली. एकेकाळी बिजेपी सेना युतीमध्ये शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून यायचे पण ऊध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेपेक्षा बिजेपीचे उमेदवार जास्त निवडुण आले होते..
२०२२ सालच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ऊध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले व शिवसेना फुटली... बिजेपीच्या संगनमताने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.. याकाळात कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ऊध्दव ठाकरे यांना वार्यावर सोडून दिले..एकिकडे एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी गुहाटीला गेले असतानाच पडद्याआड राष्ट्रवादी काँग्रेस व बिजेपीच्या सत्तेसाठी वाटाघाटी सुरू होत्या अशा तेव्हा बातम्या आल्या होत्या..
यानंतर ऊध्दव ठाकरे सैरभैर झाले होते..व तेव्हा सुभाष देसाई यांनी पुढाकार घेऊन एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत वाटाघाटी करून वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ऊबाठा यांची युती घडवली... तेव्हा आंबेडकर भवनमध्ये ऊध्दव ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषद व प्रबोधनकार ठाकरे यांच्या वरील एक न्युज पोर्टले उद्घाटन सुध्दा दोघांनी केले होते...
एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या शिवसेनेचा चेहरा मोहरा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत युती केल्याने पुरोगामी व परिवर्तनवादी पक्ष म्हणून महाराष्ट्रात मान्यता पावले... संबंध महाराष्ट्रातील जनतेला अतिशय सक्षम पर्याय उपलब्ध झाला अशी तेव्हा जनतेच्या मनात भावना निर्माण झाली होती... महाराष्ट्रात प्रथमच प्रबोधनकार ठाकरे व डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर ही आघाडी वाटचाल करत महाराष्ट्रात पुन्हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा झंझावात निर्माण होईल असे सर्व महाराष्ट्रात वातावरण निर्माण झाले होते..तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी खुप मोठी वातावरण निर्मिती केली होती याचा परिणाम म्हणून गलितगात्र व सैरभैर झालेल्या ऊध्दव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीमुळे पुन्हा उभारी मिळाली...
आणि... २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप बोलणी करण्यासाठी ऊध्दव ठाकरे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व अधिकार दिले असताना ऊध्दव ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या अवसानघातकी स्वभावाचे पुन्हा प्रत्यय घडवले... कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व ऊध्दव ठाकरे यांनी आपापसात जागावाटप केले व वंचित बहुजन आघाडीला वार्यावर सोडून दिले.. वंचित बहुजन आघाडीची फरफट होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढवली.
आता एकनाथ शिंदे यांनी बदलत्या परिस्थितीत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "शिवशक्ती भिमशक्तीचा" प्रयोग राबवण्याचे सुतोवाच केले... वास्तविक आनंदराज आंबेडकर यांची मर्यादित ताकद असताना एकनाथ शिंदे हे लवचिक व बदलत्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांचे राजकिय पक्षांसोबत युती करून परीपक्वतेचे दर्शन घडवले ते ऊध्दव ठाकरे यांनी मात्र शिवशक्ती भिमशक्तीच्या प्रयोगाची अंमलबजावणी करताना दोन्ही वेळा अवसानघातकी भुमिका घेतली...
बदलत्या परिस्थितीत जो लवचिक भुमिका घेऊन आपल्या पक्षाची जमीनी स्थिती कशी आहे याचे अवलोकन करून दोन पावले मागे जाऊन निर्णय घेतो तो पुढे पुढे जात असतो.... एकिकडे बिजेपी किंवा एकनाथ शिंदे छोट्या छोट्या समुहाचे छोट्या छोट्या पक्षांशी युती करत असतात पण कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व ऊध्दव ठाकरे हे मात्र छोट्या छोट्या समुहाचे पक्षांना निवडणुकीत वापरून फेका हे धोरण अवलंबित असते हे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत सिध्द झाले... यांनी शेतकरी कामगार पक्ष व कम्युनिस्ट पक्ष तसेच रिपब्लिकन गटांचे पक्षांना आश्वासन देऊन बोळवण केली होती हा इतिहास आहे. कदाचित मी मांडलेल्या विश्लेषणामुळे बरेच मित्र संभ्रमित होईल पण मी ह्या नवीन युतीचा समर्थक वगैरे नाही मी ह्या आघाडीचा विरोध करतो व हे राजकिय विश्लेषण मी तटस्थपणे केले आहे...
0 टिप्पण्या