महानगरातील कॉर्पोरेट हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुल ( बीकेसी) चे नाव बदलून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या नावाने "बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स" असे नवीन नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सोमवारी केली. त्यावर लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय केला जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले आहे.
वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी त्यांची सोमवारी भेट घेत लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
बीकेसीच्या प्रवेशद्वारावरच कलानगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. वांद्रे परिसरात बाळासाहेबांचे सान्निध्य आणि शिवसेनेची बुलंद गर्जना ऐकू आली. त्यांच्या अनेक सभा बीकेसी मैदानावर गाजल्या आहेत. त्यामुळे वांद्रे -कुर्ला संकुलाचे नाव बदलून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या नावाने, "बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स" असे देण्यात यावे, अशी मागणी वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या