Top Post Ad

आधी पार्किंग धोरण राबवा, मग टॉविंग व्हॅनचे नाटक करा

गेल्या सहा महिन्यापासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोइंग व्हॅन पुन्हा सुरू केल्याने ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरात पार्किंग करण्यासाठी सोया नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने टोइंग व्हॅन लादली जात आहे. त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा, मग टॉविंग व्हॅनचे नाटक करा असा इशारा देत टोइंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाने केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ठाणेकरांच्या वतीने आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना आज पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. 


   ही टोइंग व्हॅन ही पद्धत कायदेशीर असल्याचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोइंग व्हॅन सुरू करण्याचे टेंडर काढले आहे का ? टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली का? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार केला. त्यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचे दिसून आले. दरम्यान, आम्ही मुदतवाढ दिलेली आहे असे कारण पुढे करून चालढकल केल्याचे निष्पन्न झाले.  ठाणे महापालिका व वाहतूक शाखा यांच्या सहमताने ज्या पद्धतीने शहरांमध्ये दुभाजक टाकण्यात आल्याने वाहने उभी करण्यात अडचण होत आहे. नागरिकांसाठी ठीक ठिकाणी पार्किंगची सोय का उपलब्ध होत नाही. पहिले पार्किंगचे धोरण निश्चित करा. शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी टोइंग व्हॅन चालवली जाणार असेल तर आमचा विरोध असणार अशी रोखठोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com