दिनांक ४ जून २०२५ "विघ्नहर्ता" पोलीस वसाहत यशोधन नगर, ठाणे मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व ड्रेनेज कामाचे लोकार्पण आणि ज्येष्ठ नागरी सत्कार सोहळा थाटात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, ठा.म.पा. शिवसेनेचे गटनेते आणि कार्यसम्राट नगरसेवक मा.दिलीपजी बारटक्के यांच्या प्रयत्नांमुळे हे काम पूर्ण झाले.या कार्यक्रमाला शिवसेना उपविभागप्रमुख तथा पोलीस मित्र संघटना अध्यक्ष गणेशजी तांबे, सदाशिव बोडसे, महासंघाचे अध्यक्ष शशिकांत महाडिक, पदाधिकारी श्री प्रदीप पालांडे, माजी वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश सोंडकर, तसेच विघ्नहर्ता सोसायटीचे सर्व सभासद, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामामुळे विघ्नहर्ता वसाहत रहिवाशी परिवारामध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यात विशेष भाग म्हणजे सोसायटीतील ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.पर्यावरण दिनाच्या औचित्याने औषधी वनस्पतीचे लागवड व्हावी यासाठी श्री. बारटक्के साहेबांनी रोपे वाटप केली तसेच श्री वाघमोडे हयांची "महाराष्ट्र राज्य महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच, मुंबई" या संस्थेच्या कोकण विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मा.दिलीपजी बारटक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मी शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता तसेच पोलीस मित्र असल्याने जिव्हाळ्याचा विषय असल्याने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञ आहे आणि अशीच सेवा करत राहू असे मत उपविभागप्रमुख गणेश तांबे ह्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या