:‘लय भारी’ या न्यूज पोर्टलचे संपादक तुषार खरात यांना मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून खंडणीच्या आरोपाखाली दहिवडी पोलिसांनी जिल्हा सातारा येथे अटक केली. तसेच त्यांच्यावर तात्काळ अन्य एका तक्रारीनुसार वडूज येथे अॅट्रोसिटी आणि इतर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपांचा शहानिशा व तपास करण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्याची पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली. जयकुमार गोरे यांच्याविषयी दिल्या जाणार्या बातम्या थांबवण्यासाठी खरात यांना अटक करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न शासन यंत्रणेने केला
एका मागोमाग एक एकूण चार केसम्ध्ये कारागृहात बंदी असलेले ‘लय भारी न्यूज'चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे. ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर करताना मंत्री जयकुमार गोरे तसेच पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. जामीन दिल्याबद्दल पत्रकार तुषार खरात यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरते, हे माझ्या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना तुषार खरात यांनी व्यक्त केली. माझ्या या संघर्षात एका रुपयाच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता तब्बल ३६ वकिलांनी माझ्या वकीलपत्रावर सह्या केल्या. तसेच राज्यभरातील विविध पत्रकार संघटना आणि सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी या संघर्षात मला व माझ्या कुटुंबाला भक्कम आधार दिला, त्याबददल मी या सगळ्यांचा आभारी आहे, असे खरात यांनी सांगितले.
0 टिप्पण्या