– दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचितच्या मुंबई प्रदेशतर्फे CSMT येथील DRM मुख्यालयात आज धडक दिली. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने DRM अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वाच्या मागण्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुंबई प्रदेश वंचितने केल्या आहेत.
काल मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेची सर्व जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे. रल्वे प्रशासनाने अपघातग्रस्तांना विमा लागू करण्याची मागणी मान्य केली नाही. कारण महाराष्ट्र सरकारने आधीच आर्थिक मदतीची घोषणा केली असल्यामुळे केंद्र सरकार वा रेल्वे वेगळी मदत जाहीर करू शकत नाही, असे DRM अधिकाऱ्यांनी यावेली वंचितच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, रेल्वेने स्वयंचलित दरवाज्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गर्दीच्या परिस्थितीत हे दरवाजे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकतात, अशी भीती वंचितने व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने मुंबईच्या लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाने सुरक्षेबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई प्रदेश महासचिव विश्वास सरदार, सतीश राजगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
- १. मुंब्रा रेल्वे स्थानक येथे झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी मध्य रेल्वे प्रशासनकडून झाली पाहिजे.
- २. दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेले तसेच दवाखान्यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांना योग्य मोबदला द्यावा.
- ३. रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन कशा प्रकारे ठोस उपाययोजना करणार आहे याबाबतचा खुलासा मध्य रेल्वे प्रशासनाने करावा.
- ४. मागील अनेक वर्षांमध्ये झालेल्या दुर्घटना तसेच काल मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेची सर्व जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाने घ्यावी. अशा प्रकारच्या मागण्या वंचितने केल्या आहेत.
0 टिप्पण्या