Top Post Ad

अहमदाबाद विमान दुर्घटनेत .... एक प्रवासी वाचला असल्याचा दावा

गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या अपघाताची दोन संभाव्य कारणे समोर आली आहेत. पहिले कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात घडला. दुसरे म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर जाऊन आदळले आणि त्यानंतर ते जळून खाक झाले.  एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सर्वत्र धूर आणि मलबा पसरला. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.  दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी एक प्रवासी जिवंत आढळल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला. सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात  नागपुरातील एका कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे.  प्राप्त माहितीनुसार शहरातील व्यापारी मनीष कामदार यांची मुलगी, सासू आणि नात यांचा मृत्यू झाला आहे. .  यात कुशयशा कामदार, रुद्र मोढा और रक्षा मोढा यांचा समावेश आहे. यशा यांचे लग्न अहमदाबाद येथील मोढा कुटुंबात चार वर्षांपूर्वी झाली. हे कुटुंब मूळचे अहमदाबाद येथील आहे. परंतु नंतर ते लंडन येथे स्थायी झाले. 

सध्या अपघाताचे कारण कळू शकलेले नाही तरी अहमदाबादहून निघाल्यानंतर लगेचच अपघात झालेल्या विमानात एक व्यक्ती दिल्लीहून अहमदाबादला आली होती. या व्यक्तीने आपले नाव आकाश वत्स असे सांगितले आहे. त्याने असा दावा केला आहे की त्याने उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक समस्यांबद्दल तक्रार केली होती. विमानात खूप 'विचित्र' परिस्थिती होती. ए.सी. काम करत नव्हते.  प्रवासी वर्तमानपत्रांनी स्वतः लावत होते. टीव्ही स्क्रीन, रिमोट काम करत नव्हते. सोशल मिडीयाद्वारे त्याने हे सांगितले आहे. तसेच याबाबत एअर इंडियाने आपल्याशी संपर्क केल्यास आपण अधिक माहिती देऊ असेही म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com