मुंबई महानगरपालिकेच्या पवई येथील महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात (एमसीएमसीआर) आता शैक्षणिक/ संविधानिक / संचालक मंडळ बैठक, संमेलने आणि परिसंवादांचे आयोजन करण्यासाठी जागा भाड्याने उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. निसर्गरम्य आणि अत्यंत प्रशस्त अशा या केंद्रात खासगी बैठका आणि परिसंवादांचे आयोजन करण्यासाठी https://mcmcr.mcgm.gov.in या संकेत स्थळावरून नागरिकांना जागा भाडेतत्वावर घेता येईल. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कौशल्य आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षण केंद्र विविध सोयी-सुविधांनी युक्त असून सामान्य नागरिकांनाही या प्रशिक्षण केंद्राचा उपयोग व्हावा यासाठी खासगी बैठका, समेंलने आणि परिसंवादांसाठी हे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
- *सभा, संमेलने आणि परिसंवादांच्या आयोजनासाठी सुयोग्य ठिकाण*
- *या प्रशिक्षण केंद्रात प्रशस्त अशा खालील प्रमाणे २७ खोल्या उपलब्ध आहेत.*
- *अ. क्र - आ. क्षमता - एकूण खोल्या*
- १.मिटिंग रूम -९ -३
- २.बोर्ड रूम -१५ -१
- ३. संगणक प्रशिक्षण केंद्र -२० -१
- ४.वर्ग खोल्या -१८ -४
- ५.वर्ग खोल्या -२० -३
- ६.वर्ग खोल्या -५० -३
- ७.सेमिनार हॉल -४३ -१
- ८.सेमिनार हॉल -४८ -३
- ९.सेमिनार हॉल -५३ -१
- १०.अनौपचारिक प्रशिक्षण केंद्र -५० -१
- ११.सभागृह -६८ -१
- १२.ऑडिटोरियम रूम -९३ -३
- १३. प्रदर्शन हॉल -२०० -२
* सर्व खोल्यांमध्ये वातानुकुलीत यंत्रणा.
* दोनशे वाहने उभी राहतील एवढे प्रशस्त असे वाहनतळ.
* सभागृहांमध्ये ध्वनीक्षेपण यंत्रणा.
* दृकश्राव्य सादरीकरणासाठी प्रोजेक्टरची सुविधा.
* पंखे, जनरेटर बॅकअप.
* पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर.
* प्रत्येक मजल्यावर स्त्री आणि पुरूषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह.
* अभ्यागतांच्या भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त जागा.
* सीसीटीव्ही यंत्रणा.
* खोल्यांमध्ये पुरेसा सूर्य प्रकाश येण्यासाठी मोठ्या खिडक्या.
0 टिप्पण्या