मागील अनेक वर्षापासून ज्युनिअर आर्टीस्टना असलेल्या समस्यांवर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन कार्य करीत आहे. मागील दहा वर्षापासून न झालेल्या पगारवाढीबाबत असोसिएशनने थेट सिने निर्मात्याकडे धाव घेतली. याबाबत झालेल्या बैठकीत लवकरच तोडगा निघणार असतानाच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) द्वारे यामध्ये जाणिवपूर्वक धांदली करण्यात येत असल्याचा आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी फेडरेशनद्वारे होत असलेल्या अन्यायाबाबत प्रसार माध्यमांना सांगितले. यावेळी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन, मुंबईचे विधी प्रमुख सल्लागार अॅड. यशवंत गंगावणे, असोसिएशनचे अध्यक्ष-अरविंद सकट, सचिव- वसीम बैग, खाजिनदार- सरफुद्दीन शेख, उपाध्यक्ष- गफूर शेख, सह सचिव- तौसीफ काजी, समिती सदस्य- अज़ीज़ खान / हुसैन शेख । रोहित ठाकुर । हैदर शेख / राजेन्द्र गुजराल / अयूब खान । इमरान काज़ी आदी मान्यवर उपस्थित होते.
सिने निर्मातांसोबत पगाराबाबत होणाऱा निर्णय रद्द व्हावा किंवा होऊच नये यासाठी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE)ने असोसिएशनच्या निवडणुकीच्या खेळ सुरू केला. या बेकायदेशीर व अनधिकृतपणे घेण्यात येणाऱ्या निवडणुकांना ताबडतोब स्थगिती देण्यात यावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू असेही यावेळी विधी सल्लागार अॅड. यशवंत गंगावणे म्हणाले.जूनियर आर्टिस्ट असोसिएशन (JAA) जोगेश्वरी मुंबई च्या निवडणुका घेण्याविषयीचे फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संघटनेस सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई यांनी कोणतेही निर्देश दिलेले नसताना फेडरेशनने बळजबरीने, बेकायदेशीर व अनधिकृत पद्धतीने असोसिएशनच्या माहितीशिवाय वा त्यांच्यासोबतच्या बैठकी शिवाय दिनांक 17 मे रोजीच्या पत्रकाद्वारे दिनांक 1 जून रोजी निवडणुका व निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित केलेले आहे. या कृतीवर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन द्वारे तीव्र आक्षेप नोंदवल्या नंतरही बेकायदेशीर व अनधिकृतपणे निवडणुक प्रकियेचे जाहीर केलेल्या वेळापत्रकनुसार 22 मे रोजी नामांकन अर्ज भरण्या पासून सुरू होणारी प्रक्रिया 1 जून रोजी निवडणूक घेण्यात येऊन दि.2 जून रोजी मतमोजणी व निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तरी वेळापत्रक तातडीने माघारी घेण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया रद्द वा स्थगित करावी अशी असोसिएशनची मागणी आहे.
फेडरेशनचे हे कृत्य बेकायदेशीर असून लोकशाहीचा गळा घोटणारे व ज्युनिअर आर्टीस्ट असोसिएशन या संघटनेच्या कामकाजात बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करणारे आहे. सहायक कामगार आयुक्तांनी फेडरेशनला सध्याची व्यवस्थापकीय समिती बरखास्त करण्या विषयीचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या सुधारित घटनेनुसार तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवडणुका घेण्याची आणि त्यानंतर निवडणुका घेण्याची तसेच निवडणुकीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. दिनांक 9 में 2025 रोजी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशने सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिलेल्या पत्र क्र.17 / 421 नुसार दिनांक 31 में 2025 रोजी बैठकीचे मुख्य विषय (अजेंडा) ठरवून बोलावली आहे. बैठकीद्वारे निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या छाननी समितीची नियुक्ती करून निवडणूक सूचना जारी करून पार पाडणार आहेत. जुनिअर आर्टिस्ट असोसिएशन यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिनांक 1 जून 2025 रोजी फेडरेशनच्या द्वारे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका थांबवण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी फेडरेशनला दिनांक 22 मे 2025 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानंतर फेडरेशनने जनरल कौन्सिलची बैठक बोलावली आणि दिनांक 1 जून 2025 रोजी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनची बैठक पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे
फेडरेशनचे कर्मचारी, सहकारी व व्यवस्थापन व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतरांनी ज्युनिअर आर्टीस्ट असोसिएशनच्या विरोधात बेकायदेशीरपणे प्रतिनिधित्व केले आहे. फेडरेशनद्वारे मदतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आलेले आहेत अशी खात्रीशीर व पुराव्यानिशी माहिती आहे. इतकेच नव्हे तर ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यत्वाच्या नावाखाली आणि निवडणूक नामांकन फॉर्म याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात पावत्या देऊन पैसे गोळा केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या नावे पैसे गोळा करणे, बनावट कागदपत्रे तयार करून फेडरेशनकडे देणगी देणे अशा प्रकारच्या कृती करणे है BNS च्या कलम 318, 319 व 335 अन्वये स्पष्ट पणे गुन्हा आहे, फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या अशा जबरदस्तीमुळे आर्ट डायरेक्टर राजू सपाटे यांनी फांसी लावून आत्महत्या केली, इतकेच नव्हे तर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांवर जबरदस्ती आणि रेप केसचा देखील गुन्हा दाखल असल्याचा आरोप गंगावणे यांनी केला.
हे कृत्य म्हणजे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या विरोधात कट रचण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करणे असेच आहे. तसेच फेडरेशनने ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या अनेक सदस्यांना दिनांक 1 जून 2025 रोजीच्या बेकायदेशीर व अनधिकृत पणे होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी आणि निवडणुकीत उपस्थित राहण्यासाठी धमक्या दिल्या आहेत. असोसिएशनच्या कामात ढवळाढवळ करणे, तसेच निवडणुका घेणे ही फेडरेशनची बेकायदेशीर कृती जूनियर आर्टिस्ट असोसिएशन आणि त्यांच्या सदस्यांवर बंधनकारक राहणार नाही. दिनांक 1 जून, रोजी जाहीर केलेल्या बेकायदेशीर व अनधिकृत निवडणुका सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या निर्देशांचा भंग करणाऱ्या असल्याने तात्काळ रद्द करण्यात याव्यात किंवा थांबवण्यात याव्यात. अन्यथा कायदेशीर कारवाई करू. असे आवाहन ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन द्वारे फेडरेशनला यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या