महानगर पालिकेच्या निवडणुका घेण्याबाबत नुकतेच न्यायालयाने निवडणुक आयोगाला आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या कार्यकर्त्यांचे आयाराम गयाराम सुरु आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अत्यंत विश्वासू मानले जाणारे नगरसेवक मिलिंद पाटील आणि काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिली आणि शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केला. त्यामुळे कळवा, विटावा व खारीगाव परिसरात राष्ट्रवादीत प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. मिलिंद पाटील (माजी विरोधी पक्षनेता, ठाणे महानगरपालिका) पंधरा वर्षे ब्लॉक अध्यक्षपदावर होते, कळव्याचे एकहाती साम्राज्य त्यांच्या मार्फत राष्ट्रवादीच्या हाती होते. पण पाटील यांनी राष्ट्रवादीतून गयारामची भूमिका घेतल्यानंतर त्या पदावर तेवढ्या क्षमतेची व्यक्ती मिळणे अवघड झाले होते. मात्र अखेर आव्हाड यांनी अत्यंत निष्ठावंत व निकटवर्तीय कार्यकर्ते ॲड. कैलास हावळे यांची अत्यंत विश्वासाने आणि जबाबदारीने ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच कळवा ब्लॉक कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेश खारकर यांचे नियुक्ती ही करण्यात आली आहे.
पक्षाने टाकलेल्या या जबाबदारीचे आपण स्वागत करत असून. जितेंद्र आव्हाड यांनी विश्वासाने दिलेल्या या संधीचे आपण सोने करू. तसेच विभागात पक्ष बांधणीसाठी आणि पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू. कळवा, विटावा व खारीगाव परिसरातील जनतेच्या प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीकरीता आपण जागरुक राहून कार्य करू. असे मत ॲड .कैलास हावळे यांनी आपल्या नियुक्तीबाबत प्रजासत्ताक जनताशी बोलतांना व्यक्त केले.
0 टिप्पण्या