Top Post Ad

बहिष्कार करायचाय तर करा, पण सोबत सरकारला प्रश्न विचारा.

 अजरबैजान, तुर्की आणि मलेशिया या देशांवर बहिष्कार टाकावा अशी जोरदार मोहीम सुरू आहे. कारण त्यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला. देशभक्ती जागलीच असेल मनात, फार जास्त उचंबळून आली असेल तर असा अर्धवट बहिष्कार कृपया टाकू नका.  आपली अजरबैजान, तुर्की, मलेशियाची केलेली/न केलेली बुकिंग्ज कॅन्सल करून दुसरीकडे कुठे जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी आपल्या बहिष्कृत देशांच्या लिस्टमध्ये पुढील देश ॲड करा!  कारण आयएमएफमधील २४ देशांनी पाकिस्तानला २.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास पाठिंबा दिला.  त्यात- अमेरिका. चीन, नेदरलँड्स, जपान, युके, जर्मनी, फ्रान्स, इटली, दक्षिण कोरिया, युएई. रशिया, अर्जेंटिना, कॅनडा, यांचा समावेश आहे. या देशांवरही बहिष्कार का टाकू नये?  जेडी व्हान्स आणि ट्रम्प यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. एफ १६ हे एक अमेरिकन लढाऊ विमान आहे आणि अमेरिकेने ते पाकिस्तानला पुरवले. आपल्यालाही अमेरिकेवर बहिष्कार टाकण्याची गरज नाही का?  असं असेल तर देशातच फिरा, त्यातही पुन्हा काश्मीरवर बहिष्कार आहेच, म्हणजे ते गेलं!   

बहिष्कार करायचाय तर करा पण सोबत सरकारला योग्य प्रश्न विचारा.  या सर्व देशांनी पाकिस्तानला पाठिंबा का दिला व आपण कुठे मागे पडलो याचा विचार होणार आहे का?   आता यातील पहिले तीन देश म्हणजे अजरबैजान, तुर्की व मलेशिया यांनी दिलेला पाठिंबा हा केवळ religious basis वर आहे. या देशांमध्ये धार्मिक कट्टरता आधीपासूनच आहे. पण भारताप्रती ही कट्टरता अधीक तीव्र होण्यास भारत स्वतः कारणीभूत आहे हे नाकारल्यास आपण आपलीच फसवणूक करतोय असं होईल.  गेली १०-११ वर्ष देशात मुस्लिमविरोधी वातावरण जोपासलं व पोसलं जातंय. कधी गौतस्करीचा संशय तर कधी फ्रिजमध्ये बिफ असल्याचा संशय तर कधी हिंदू मुलींना बहकवण्याचा संशय…अशा कित्येक बहाण्यांनी मुस्लिमांना मारणे, जीवे मारणे सुरू आहे देशात. सुरूवातीचा काही काळ काही संघटना ही कृत्य करत होती पण हळूहळू हे काम सरकारांनी हाती घेतलं. फक्त बदल एवढाच की आता मुस्लिमांवर बुलडोझर चालू लागले. लोक बुलडोझर ‘न्याय’ जल्लोषात सेलिब्रेट करतात. पुढे जाऊन मग या मशिदीखाली हे मंदिर शोध, त्या मशिदीखाली दुसरं हे अगदी कोर्टांच्या मदतीने सुरू झालं. 

भाजप नेता आये दिन मुस्लिम विरोधी विधानं करतात, बिदुरी संसदेत कटूवे, उग्रवादी आणि काय काय बोलला. अनुराग ठाकूर म्हणतो गोली मारो सालोंको. कालच तो मध्य प्रदेशमधील कुणी शाह कर्नल सोफिया कुरैशींना दहशतवाद्यांची बहीण म्हणाला.  नेत्यांचंच काय स्वतः मोदी काय काय बोललेत मुस्लिमांबद्दल अगदी मागचं स्मशान-कब्रस्तान असो की मग कपडों से पहचान लेता हूँ ते ज्यादा बच्चे पैदा करनेवाले, मंगलसूत्र छिन लेंगे आणि लेटेस्ट म्हणजे पंक्चर बनानेवाले. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हण आहे पण इथे ती उलटी लागू पडते. इथे मोदीरूपी आडच इतका भरलेला आहे तर त्यांचे चट्टेबट्टे पोहरे ओथंबून वाहणार नाहीत तर काय होणार मुसलमान द्वेषाने.  हे सगळं देशात होत असताना मांजरांने डोळे मिटून दूध पिण्यासारखं करुन काय उपयोग आहे...सगळं जग हे बघतंय. जगात हा संदेश कधीच पसरलाय की भारत हा मुस्लिम विरोधी देश आहे. भारतात मुसलमानांवर अत्याचार केले जातात. त्यांच्यावर विनाकारण आर्थिक बहिष्कार टाकला जातो. उगाच नाही ती बिंदी बाई आपली नसलेली अक्कल चमकवत…तिच्या विखारी प्रचाराला लोकमान्यता मिळते. 

पाकिस्तानला डोळे झाकून पाठिंबा देण्यासाठी ही कारणं चिक्कार आहेत या देशांना, भारताने हे आम्ही करत नाही म्हणावं किंवा हिंमत असेल तर थांबवावं. परवाच्या भाषणात मोदींनी चुटक्या वाजवत-बोटं नाचवत पाकिस्तानला जे सांगितलं ते त्यांनी एकदा प्रामाणिकपणे स्वतःला व नंतर देशाला, गोदी मीडियाला सांगावं. त्यांनी सांगावं की, आपण जसे या देशाचे नागरिक आहोत तसेच मुसलमानही बरोबरीचे नागरिक आहेत. तेही आपले देशबांधव आहेत. त्यांच्यावर कुणी कसल्याही प्रकारच्या बहिष्काराची भाषा करणार नाही, त्यांची घरं-दुकानं विनाकारण बुलडोझ केली जाणार नाहीत. वेगवेगळ्या जिहादांखाली त्यांना गुन्हेगार ठरवलं जाणार नाही. हे करावं व मग इतर देशांवर बहिष्कार घालत फिरावं! 

चूक पाकिस्तानची होती पण ट्रम्पने बोलताना एकदातरी तसा उल्लेख केला का? उलटं त्याने भारताला पाकिस्तान सोबत नेऊन बसवलं जे याआधी कधीच झालं नव्हतं. का ट्रम्प म्हणतो की तो काश्मीरमुद्दावर मध्यस्थी करणार आहे…का यावर मोदी स्पष्टपणे बोलत नाहीत. काश्मीर या आपल्या अंतर्गत मुद्द्यावर का तिसरा देश बोलतो?  पाकिस्तान दहशतवादाचं समर्थन करतो, त्यांना संरक्षण देतो हे काही जुनं नाही, हे जग जाणतो पण तरीही अशा पाकिस्तानला उघड वा आडून हे सगळे देश पाठिंबा देतात यामध्ये पाकिस्तानचं काही कतृत्व असावं असं वाटतं का? तर नाही….मग आपल्या देशाची diplomacy सपशेल फसलीये हे कळू नये का? जयशंकर विदेश मंत्री म्हणून काय खोटे लेजर डोळे दाखवण्यापुरता आहे का? 

आज आपल्या आजूबाजूच्या एकही देश आपला मित्र आहे हे म्हणण्याची सोय राहिली नाही. राहुल गांधी म्हटले तसं, चीन-पाकिस्तानला एकत्र आणण्याचे 'पाप' या सरकारने केलंय.. या सगळ्या गोष्टींवर सरकारला, पंतप्रधानांना, विदेशमंत्र्यांना जाब विचारायचा सोडून हे काय करणार तर देशांवर, लोकांवर बहिष्कार घालणार! 

Monika N /fb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com