श्रमिक जनता संघ युनियनची ५९वी राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा (अधिवेशन) यंदा कल्याण येथे सोमवारी २ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे सचिव व कल्याण येथील कामगार नेते सुनील कंद यांनी दिली आहे. टिळक चौक, कल्याण येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर देवस्थानचे मंगल कार्यालयात संपन्न होणार असून अधिवेशनात युनियनच्या अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात युनियनचे उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, जनरल सेक्रेटरी जगदीश खैरालिया यांच्या सह युनियनच्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथील विविध युनिट्स मधील पदाधिकारी, कार्यकर्ते विविध क्षेत्रातील कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांसहित असुरक्षित आणि असंघटीत क्षेत्रातील मोलमजुरी करणारे तसेच स्वयंरोजगार करणारे फेरीवाले, मछली विक्रेते, घरेलु कामगार आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात आगामी काळासाठी युनियनचे पदाधिकारी, जनरल कौन्सिल सदस्य, कार्यकारी समिती/ व्यवस्थापकीय समितीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या