Top Post Ad

मुंबई मराठी पत्रकार संघात सुलेखनकार सुदीप गांधी यांच्याकडून सुरेख अक्षरांची जादू

शब्दांना सौंदर्याची किनार लाभली, अक्षरांनी कलात्मकतेचा साज चढला आणि ‘कागदावर उतरली एक नयनरम्य जादू’ हे दृश्य होते मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित सुलेखन कार्यशाळेचे, जिथे आबालवृद्धांनी अक्षरांच्या दुनियेत मनसोक्त फेरफटका मारला. कार्यशाळेचे मार्गदर्शन केले सुप्रसिद्ध सुलेखनकार सुदीप गांधी यांनी. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी उत्साहाने बुडून गेले सुलेखनाच्या गोडीत. कार्यशाळेच्या प्रारंभापासूनच उपस्थितांमध्ये उत्सुकता ओसंडून वाहत होती. ‘अ’ पासून ‘ज्ञ’पर्यंत प्रत्येक अक्षराशी नव्याने मैत्री करत, विविध फॉन्ट्स, स्ट्रोक्स, वळणं आणि रचनांचा सुरेख अभ्यास करण्यात आला.


   कार्यशाळेचा अविभाज्य भाग म्हणजे सुदीप गांधी यांची मनमोहक प्रात्यक्षिकं. त्यांनी अक्षरांच्या सौंदर्यशैली कशा विकसित करायच्या, अक्षररचना कशी करायची आणि कॅलिग्राफीचा वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक वापर कसा करता येतो, याची सखोल माहिती दिली. त्यांच्या सहजसुंदर शैलीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.कार्यशाळेत सहभागी झालेल्या बालगोपाळांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. ‘हाताने लिहिताना अक्षरं इतकी सुंदर दिसू शकतात, हे आज लक्षात आलं,’ असं एका आठ वर्षीय सहभागीने सांगितलं. तर वयोवृद्धांनी ही कला नव्याने शिकताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सुलेखन म्हणजे डान्सिंग ऑन पेपर अशी उत्स्फूर्त प्रतिक्रया व्यक्त झालेल्या या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अर्थखात्याचे उपसचिव विनायक धोत्रे आणि सुदीप गांधी यांच्या हस्ते प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात आलं. उपस्थितांनी संयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सर्व सहकार्‍यांचे विशेष योगदान लाभले.पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्वेâ, उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे संकल्पक राजेंद्र हुंजे व स्वाती घोसाळकर, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, कार्यकारिणी सदस्य राजेश खाडे, विनोद साळवी, अंतर्गत हिशोब तपासनीस हेमंत सामंत आदी यावेळी उपस्थित होते.ही केवळ एक कार्यशाळा नव्हती, तर शब्दांनी आणि अक्षरांनी नवे क्षितिज गाठण्याचा, सौंदर्याची पुनर्शोध करण्याचा एक प्रेरणादायी प्रवास होता, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com