Top Post Ad

व्यवस्थेच्या कारस्थानाला का व कसे बळी पडतात

 १२०० वर्ष या भारतवर्षात रुजलेला बुद्धविचार बुद्धाला देव बनवून भारतातून नष्ट करण्यात आला. त्याच पद्धतीने शिवाजी_महाराजांना देव बनवून त्यांच्या आरत्या करून महाराजांचे विचार व कार्य संपवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक मनुवाद्यांकडून चालू आहेत व बहुजन समाज मोठ्या उत्साहाने, आनंदाने आरतीच्या वेळी उभे राहून टाळ्या वाजवून त्याला हातभार लावत आहे. कारण कशाचे काय परिणाम होतात, हे इतिहासाचा किंवा कोणत्याच सामाजिक_शास्त्रांचा, वैचारिक_साहित्याचा अभ्यास नसल्याने त्यांना माहिती नाहीये. बहुजनांमधील कित्येक जण श्रीमंत, अतिश्रीमंत नोकरदार, राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक, इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर, वकील आहेत. पण वैचारिकदृष्ट्या खूप कमकुवत आहेत. त्यात पुन्हा आपल्या समाजातील आ_ह_साळुंखे, शरद_पाटील, पुरुषोत्तम_खेडेकर या व इतर अनेक अभ्यासू लोकांचे ऐकण्यापेक्षा मनुवाद्यांच्या कारस्थानाला का व कसे बळी पडतात, हे आता तरी आकलनाच्या पलीकडचे असल्याचे जाणवायला लागले आहे. 

   आरती_देवांची केली जाते. महापुरुषांना_वंदन केले जाते. एवढे साधे सोपे आपल्या लोकांना कळत नाहीये. कोणत्याच संकल्पना आपल्या स्पष्ट का नाहीयेत? उपयोग काय शिक्षणाचा?  १- २ वर्षांपूर्वी हे फॅड नव्हते. आताच दिसू लागले आहे. तेव्हा हे आता इथेच थांबवायला हवे.  त्यात पुन्हा खेड्यापाड्यातील लग्नांमध्ये हे सुरू झालेले नाहीये. म्हणून या बाबतीत कमी शिकलेले खेड्यापाड्यातील लोकं चांगली असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील शिकलेल्या लोकांनी अशिक्षित, अल्पशिक्षित लोकांना दिशा द्यावी, तर ते उलटी गंगा वाहू घालत आहेत. अशाने आतापर्यंत झालेली सर्व प्रगती एका पिक पॉईंटपर्यंत जाईल व पुन्हा उलटी चक्रे सुरू होऊन जातील.  अशाने तर नजीकच्या भविष्यात शिवाजी महाराजांचे सर्वसमावेशक, रयतेच्या हिताचे विचार संपून त्यांना प्रसन्न करण्यासाठी होमहवन, विधी, नवस, उपास वगैरे सुरू होऊन जातील, असे मला वाटते.  किती वेळेस व किती माध्यमांतून आम्ही सांगावे? प्रबोधन होण्याऐवजी असे जास्तच अज्ञानी का बनत चालले आहोत आपण?
विचार_तर_कराल

 डॉ. राहुल पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com