Top Post Ad

... म्हणून भूषण गवई यांना सरन्यायाधीश पद ?

 हरेन पांड्या, सोहराबुद्दीन, जज लोया यांचे खुनाच्या आरोपातून अमित शहाना वाचविण्याचे बक्षीस म्हणून मान. भूषण गवई यांना सरन्यायाधीश पद मिळाले का ?

 भूषण गवई यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी झाली .ज्या दिवशी शपथविधी झाला. त्या दिवशी शिष्टाचार म्हणून शुभेच्छा दिल्या तिथे विषय संपला .रोज त्याचा उदो उदो बरोबर नाही. त्यानंतर सुजात आंबेडकरने यावर मत व्यक्त केले ते काही चुकीचे नव्हते, परंतु अशी मते आता टाळली पाहिजे. त्यानंतर भूषण गवईचे भाऊ राजेंद्र गवईने ज्या पद्धतीने उत्तर दिले ते अत्यंत खालच्या दर्जाचे होते . आंबेडकरी चळवळीत बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रामाणिक योगदान आहे तितके गवई कुटुंबाचे नाही. रा. सु.गवई यांचा इतिहास यावर वेगळ सविस्तर लिहिता येईल . राजेंद्र गवई ने एकंदरीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राजकीय लेखा जोखा मांडला तो अतिशय खोडसाळपण आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचं जे काही आजवरची राजकीय ताकद आहे ती दखल पात्र आहे. परंतु राजेंद्र गवई दादासाहेब गवई गेल्यानंतर पक्ष सांभाळत आहे त्यावर स्वतः आपण काय दिवे लावले हे लोकांना सांगावे .

मुळात जेव्हा १९९६ ला रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली तेव्हा अध्यक्ष पदाची निवडणुक झाली त्यात निवडणुक अधिकारी म्हणून बाळासाहेब आंबेडकर होते आणि उमेदवार म्हणून राजा ढाले ,रामदास आठवले, तळवटकर व इतर लोक उभे होते. त्यात राज्यभर पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी मतदान झाले आणि राजा ढाले निवडून आले .परंतु लोकशाही पद्धतीने निवडून आलेला पक्षाचा अध्यक्ष दादासाहेब अर्थात रा. सु.गवई यांना चालला नाही .मी पक्षात ज्येष्ठ आहे मलाच अध्यक्ष करा म्हणून अडून बसले .लोकशाही पध्दतीने निवडले गेलेले राजा ढाले गवईला चालले नाही. सर्वांनी नाईलाजाने रा. सु.गवई ला पक्षाचे अध्यक्ष केले. रा. सू.गवई ने सर्वात अगोदर काम केले की पक्षाची कार्यकारिणीमध्ये कमल गवई, राजेंद्र गवई आणि सर्व घरातील लोक चोरीने निवडणुक आयोगाला पत्र देऊन स्वतःच्या घरातील कार्यकारिणी मान्य करून घेतली. त्यानंतर सर्वात पहिले प्रकाश आंबेडकर यांची हकालपट्टी पक्षातून केली नंतर आठवले , कवाडे बाहेर पडून आपले गट शाबुत ठेवले.मुख्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा चोरलेला पक्ष गवई ने आपल्या खिशात ठेवला. पक्षाचा निळा झेंडा, उगवता सूर्य हे चिन्ह कायम गवई कुटुंबाकडे राहिले.पुढे राजेंद्र गवई ने हाच पक्ष सांभाळला पण साधा पंचायत समिती सदस्य सुद्धा राजेंद्र गवई आणू शकला नाही . रा. सु.गवई गेल्यानंतर काँग्रेस ने सुद्धा राजेन्द्र गवईला विचारले नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गवई स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांना विनवण्या करण्यासाठी आला . राजेंद्र गवई स्वतःचा पक्ष स्वबळावर उभ राहण्यासाठी धडपडतो आहे म्हणून सर्व मागील गोष्टी,मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गवईला पाठिंबा दिला. त्यानंतर राजेंद्र गवई कायम कधी भाजप ,कधी शिवसेना कधी काँग्रेस असे न मागता पाठिंबा देऊन प्रत्येक स्टेजवर पुढे पुढे करतांना दिसले .सिनेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर राजेंद्र गवई हा पूर्णता: disaster आहे.

दुसर म्हणजे भूषण गवई कडे वळूया , भूषण गवई हे कॉलेजियम सिस्टम ने जज झाले यात दुमत नाही .भूषण गवई यांच्यात कुवत आहे का तर नक्कीच आहे .भूषण गवईचे विविध मंदारातले फोटो सोशल मीडियावर कार्यकर्ते फिरवत आहेत तर मंदिरात जाणे ,धागे दोरे फोटो हा मुद्दा होऊ शकत नाही कारण राजकीय नेते सुद्धा अनेक धार्मिक स्थळांवर जातात . त्याप्रमाणे भूषण गवई गेले असतील किंवा कोणाचे भक्त असतील तो मुद्दा होऊ शकत नाही. कुठे जाणे आणि काय करणे हे भूषण गवई यांचे व्यक्ती स्वातंत्र आहे. दुसरी गोष्ट भूषण गवई हे बौद्ध  सरन्यायाधीश झाले ६ महिन्याचा कालावधी आहे आणि आता सरकारच्या चुकीच्या निर्णयावर गवई चपराक लावतील आणि काहीतरी वेगळं होईल असं चित्र उत्तर भारतातील बहुजन यूट्यूब चॅनेल चित्र रंगवत आहेत.परंतु भूषण गवई यांच्याकडून काहीही आशा नाही ना या चॅनल्सना भूषण गवई विषयी काही माहिती नाही.

एक पाप लपविण्यासाठी अनेक पाप करावे लागतात आणि. त्या पापात सहभागी असणारे यांना मोदी शहा कडून कशी खैरात दिली जाते याचे उदाहरण कसे आहे पाहा. २००१  मध्ये केशुभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री होते परंतु लालकृष्ण अडवाणी यांचे लाडके नेते म्हणून गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी ची निवड केली . त्यावेळी केशुभाई पटेल मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून हरेन पंड्या होते परंतु नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर पंड्याशी प्रचंड मतभेद झाले .दुय्यम खात मोदीने पंड्याला दिल.पुढे २००२  मध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक होणार होती परंतु त्यापूर्वी गोध्रा कांड घडवल्या गेले. मोदी अमित शहा ने कशाप्रकारे गुजरात पेटू दिले याची साक्ष नानावटी कमिशन पुढे हरेन पंड्या ने दिली.काही दिवसातच हरेन पंड्या ची हत्या झाली. सुरुवातीला असे सांगितले की पाकिस्तान मधून आलेल्या अंतकवाद्यांनी पंड्या यांची हत्या केली. त्यानंतर सोहराबुद्दीन याचे encounter करून लष्कर ए तोयबा चा आतंकवादी म्हणून घोषित केले परंतु पुढे सीबीआय तपासात सिद्ध झाले की सोहराबुद्दीनला हरेन पंड्या ला मारण्याची सुपारी देण्यात आली होती .पण हे पितळ उघडं पडल म्हणून अमित शहाने पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सांगली जवळ सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कोसरबीचे अपहरण करून सोहराबुद्दीन चे फेक encounter केले .त्याची पत्नी कोसरबीचा बलात्कार करून तिचे प्रेत जाळून टाकले. पुढे सोहराबुद्दीनचा साथीदार तुलशीराम प्रजापती चे सुद्धा एन्काऊंटर करण्यात आले. हे सर्व लक्षात आल्यावर सीबीआयने अमित शहाला अटक केली आणि सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी गुजरात बाहेर मुंबईला सीबीआय कोर्टात होईल.

२०१४ ला केंद्रात मोदी सरकार आले . अमित शहा गृहमंत्री झाले. २०१४ ला सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी CBI च्या विशेष न्यायालयात सुरू होती. सुरुवातीला हे प्रकरण जज जे. टी. उत्पत यांच्याकडे होते, परंतु 2014 मध्ये त्यांची अचानक बदली झाली. त्यानंतर जज बृजमोहन हरिकृष्ण लोया यांच्याकडे हे प्रकरण आले.या प्रकरणी जज लोया प्रचंड दबाव होता .१०० कोटी ची लाच ऑफर करण्यात आली परंतु लोया दबावाला बळी पडले नाही. लवकरच या प्रकरणाचा निकाल जज लोया देणार होते. अशातच जज लोया हे नागपुरला एका सहकारी जज च्या मुलीच्या लग्नाला जज राठी व कुलकर्णी यांच्या सोबत गेले. याच लग्नाला लोया सोबत भूषण गवई सुद्धा होते. रविभवन या शासकीय विश्रामगृहात जज लोया मुक्कामी होते.१ डिसेंबर २०१४ रोजी जज लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हे प्रकरण पूर्णपणे दबले होते परंतु पत्रकार निरंजन टकले यांनी संपूर्ण माहिती गोळा करुन, लोया यांच्या कुटुंबाशी बोलून कारवा मासिकात २०१७ मध्ये दोन रिपोर्ट छापून आणले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात या संबंधी PIL टाकण्यात आली त्यावर इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशानी पत्रकार परिषद घेऊन जज लोया संबंधी याचिकेवरून न्यायव्यवस्थेवर दबाव आणल्या जात आहे सांगितले.

जज लोया मृत्यूप्रकरणी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली याच मुख्य कारण होत ते म्हणजे भूषण गवई यांचे कोर्टाला पत्र दिले की मी स्वतः जज लोया यांना इतर ५ जण जज समवेत हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता. केवळ त्यांच्या एका पत्रावर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. प्रोटोकॉल तोडून इंडियन एक्स्प्रेसला भूषण गवई ने मुलाखत दिली.  हरेन पंड्या हत्या ते भूषण गवई यांची पत्ररूपी कोणाला तरी वाचविण्यासाठीची साक्ष ही गोष्ट लहान मुल सुध्दा समजू शकत. भूषण गवई यांना जज लोया यांचा मृत्यू कसा झाला याची पूर्ण कल्पना होती.  भूषण गवई यांच्या अगोदर शरद बोबडे हे सरन्यायाधीश होऊन गेले. लोया यांच्या मृत्यू नंतर आठ दिवसांनी अमित शहा, शरद बोबडे, न्यायाधीश मोहित शहा , सीबीआय चे एक procecuter यांची बैठक झाली . यात हेच न्यायाधीश मोहित शहा ज्यांच्यावर जज लोया यांना १०० कोटी ची लाच देण्याचे आरोप झाले .त्यानंतर लगेच अमित शहा यांना सीबीआय कोर्टाने सोहराबुद्दीन प्रकरणात निर्दोष घोषित केले.   बैठकी मध्ये असलेले शरद बोबडे हे पुढे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश झाले . २०१८ ला भूषण गवई यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पॅनल मध्ये निवडले . भूषण गवई यांच्या एका पत्राचा आधार घेऊन जज लोया यांच्या मृत्यू संबंधी याचिका फेटाळली ते भूषण गवई आज सरन्यायाधीश झाले.
 - प्रविण जाधव



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com