Top Post Ad

मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार: अर्ज स्विकारण्यास सुरुवात

 : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, दि. २१ जून, २०२५ रोजी वर्धापनदिनी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.स्वत: पत्रकार अथवा त्यांचे सहकारी पत्रकार किंवा संपादक या पुरस्कारासाठी योग्य पत्रकारांची नावे सुचवू शकतात. २०२४-२०२५ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कार निकषांना पात्र ठरणार्या पत्रकारांची माहिती आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणे आदी तपशिलासह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात सोमवार, दि. २ जून, २०२५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.  

  • पुरस्कारांचा तपशील
  • १. पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार.
  • २. कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रित शोधकास दिला जाणारा पुरस्कार.
  • ३. समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
  • ४. अॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. १०,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : वृत्तछायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
  • ५. युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप: रु.१०,०००/-स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, निकष : संपादक/ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार.

शनिवार, दिनांक २१ जून, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार्या वर्धापन दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

टीप : १) वरील पुरस्कारासाठी संपादक किंवा स्वत: पत्रकार तसेच अन्य सहकारी वर्तमानपत्रातील पत्रकारांची शिफारस करू शकतात. संबंधित माहिती (बातमी, वृत्तांत, लेख इ.) आवश्यक झेरॉक्स प्रतीसह mmps.president@gmail.com ईमेलवर पाठवावी किंवा पत्रकार संघाच्या कार्यालयात ११ ते ७ या वेळेत मुनाफ पटेल अथवा प्रभाकर हंकारे (७०३९००४८५५) यांच्याकडे संपर्क साधून आणून द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com