Top Post Ad

पहलगाम डी.जी.पी. म्हणजेच डेप्युटी जनरल ऑफ पुलीस - नलिन प्रभात !

 पहलगामला आपले निष्पाप नागरिक अतिरेकी हल्ल्यात मारले गेले... तिथले डी.जी.पी. म्हणजेच डेप्युटी जनरल ऑफ पुलीस आहेत - नलिन प्रभात !
आता जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया...
चार वर्षांपुर्वी म्हणजेच ३ एप्रिल २०२१ ला बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आपल्या जवानांना घेरून बेछूट गोळीबार केला होता. आपले २४ जवान शहीद झाले होते. त्यावेळी तिथं आय.जी. होते... तेच - नलिन प्रभात !
आणखी फ्लॅशबॅकमध्ये जाऊया...
२०१९ ला लोकसभा निवडणुकांच्या आधी जो पुलवामा हल्ला झाला... ज्यात आपले ४० जवान शहीद झाले... त्यावेळी तिथं सीआरपीएफच्या वरीष्ठ पदावर होते... तेच - नलिन प्रभात !
पुन्हा फ्लॅशबॅक...
त्याआधी नऊ वर्षांपुर्वी छत्तीसगढमधल्या दंतेवाडामध्ये सीआरपीएफ चे ७६ जवान नक्षली हल्ल्यात शहीद झाले होते. त्यावेळी सीआरपीएफचे डी.आय.जी. होते... तेच - नलिन प्रभात ! 
त्यावेळी मात्र नलिन प्रभात यांना या प्रकारात दोषी ठरवून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली होती.
तरीही नंतरच्या काळात, सरकार बदलल्यावर त्यांना ‘क्लिन चीट’ देऊन बिजापूर,पुलवामा,पहलगाम अशा संवेदनशील विभागांमध्ये एवढ्या मोठ्या जबाबदार्‍या दिल्या गेल्या, हा आपल्या गृहमंत्रालयाच्या मनाचा मोठेपणाच म्हणायला हवा, नाही का?
...आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे याच नलिन प्रभात यांनी म्हणे पाच महिन्यांपुर्वी मनाली इथं दहा करोडची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
तसेच चंदीगडला सेक्टर पाचमध्ये त्यांचा २६ करोड किंमतीचा बंगलाही आहे, असं म्हणतात !
...आणि त्यांचा पगार होता, दीड लाख रूपये महिना. जो आता सव्वा दोन लाख झाला आहे.
असो. 
नलिन प्रभात यांना पुढील ‘कामगिरीसाठी’ मनापासून शुभेच्छा.
- किरण माने.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com