Top Post Ad

पुणे शहरजवळ धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत विशाल स्तूप

 

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त मा. रत्नाकर गायकवाड साहेब व बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था पुणे यांच्या अथक प्रयत्नातून पुणे शहरजवळ खडकवासला परिसरात धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत एका विशाल स्तूपाचे आज उद्घाटन करण्यात आले. 2587 व्या बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आज थायलंडचे बौद्ध महापंडित भदंत आर्यवंग्सो गुरुजी यांच्या हस्ते स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थीधातू प्रस्थापित करण्यात आल्या.  यावेळी महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे थायलंड येथून आलेले बौद्ध उपासक उपस्थित होते. धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्ट हा जवळपास 100 एकर जागेत उभा राहत आहे. यातील पहिल्या टप्प्यात सांचीच्या स्तूपाची प्रतिकृती असलेला विशाल स्तूप, त्यामध्ये भव्य असा विपश्यना हॉल, उपोसथ हाॅल, भिक्खू निवास, साधकांचे निवास गृह, एडमिनिस्ट्रेटिव्ह भवन या इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. हे  महान असे धम्मकार्य पूर्ण करण्यासाठी मा. रत्नाकर गायकवाड साहेब यांचे समर्पण, कष्ट आणि ध्यास प्रामुख्याने उल्लेखनीय आहेत. सोबतच बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था पुणेचे अध्यक्ष मा. एम. टी. कांबळे साहेब, त्यांचे सहकारी, समर्पण वृत्तीने काम करणारे शेकडो धम्मउपासक, या धम्म कार्यासाठी कोट्यवधी रकमेचे दान देणारे धम्मानुयायी, धम्ममित्र यांचे महान योगदान यामुळेच हा प्रचंड मोठा धम्मप्रकल्प पूर्णत्वास जात आहे. 

------------------------------------------------------------


   सार्वजनिक बौद्ध जयंती उत्सव मंडळ अंबरनाथ शहर या ठिकाणी प्रथमच भारतीय बौद्ध लेणी माहितीपट एकजूट लेणी प्रचार प्रसार मोहीम चा 
32x6 ft चा एकजूट लेणी संवाद बॅनर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com