Top Post Ad

पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलकांपासून शहराची मुक्तता

सलग तिसऱ्या दिवशी शहरातील 394 अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्जवर कारवाई
15 एप्रिल पासून शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली.  ही विशेष मोहिम  सलग तिसऱ्या दिवशीही करण्यात आली. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 394 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटविण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभागसमितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्‌जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून  अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होडिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू असून ही मोहिम यापुढेही आयुक्तांच्या निर्देशनुसार सुरू राहणार आहे.या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभागसमितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.

  • नौपाडा कोपरी प्रभाग समिती  – 40
  • वागळे इस्टेट प्रभाग समिती  – 38
  • लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती  – 57
  • वर्तकनगर प्रभाग समिती  – 52
  • माजिवडा मानपाडा प्रभाग समिती  – 22
  • उथळसर प्रभाग समिती – 19
  • कळवा प्रभाग समिती – 64
  • मुंब्रा प्रभाग समिती – 10
  • दिवा प्रभाग समिती - 92

----------------------------


     दुसऱ्या दिवशी ४२२ अनधिकृत फलकांवर कारवाई
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदा फलक हटवण्याची विशेष मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही राबवण्यात आली. ठिकठिकाणी लावण्यात आलेले बेकायदा फलक, होर्डिंग्ज, जाहिराती काढण्यात आले. अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमधून एकूण ६६५ अनधिकृत फलक काढण्यात आले.        महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग आणि सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली.       या मोहिमेत विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात येत आहेत. अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्‌जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होडिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यताही असते. 

  • नौपाडा-कोपरी प्रभाग समिती  – ६५
  • वागळे इस्टेट प्रभाग समिती  – ६८
  • लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती  – ५२
  • वर्तकनगर प्रभाग समिती  – १९
  • माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती  – १०
  • उथळसर प्रभाग समिती – २४
  • कळवा प्रभाग समिती – ५०
  • मुंब्रा प्रभाग समिती – ३७
  • दिवा प्रभाग समिती -९७
  • एकूण - ४२२

------------------------------------------------------

  एका दिवसात 665 बॅनर्स, होर्डिंग्जवर कारवाई
ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात 665 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली.  ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभागसमितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्‌जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होडिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आयुक्तांच्या निर्देशानुसार हटविण्यात येत असून ही मोहिम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.  या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभागसमितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.

  • नौपाडा प्रभाग समिती  – 76, 
  • कोपरी प्रभाग समिती  – 54, 
  • वागळे इस्टेट प्रभाग समिती  – 55
  • लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती  – 66
  • वर्तकनगर प्रभाग समिती  – 65
  • माजिवडा मानपाडा प्रभाग समिती  – 67
  • उथळसर प्रभाग समिती – 53
  • कळवा प्रभाग समिती – 72
  • मुंब्रा प्रभाग समिती – 75
  • दिवा प्रभाग समिती 82

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com