मौजे चांडोली,ता.खेड.जि.पुणे येथील जमीन गट नं १२६ मधील १ हेक्टर २४आर क्षेत्र दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी सरकारजमा करण्याचा आदेश तहसीलदार खेड ज्योती देवरे यांनी पारित केला आहे. मात्र या आदेशामुळे जमिनधारकांवर शासनाने अन्यायच केला असल्याचे दिसत आहे. अटी शर्तीचा भंग तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले म्हणजेच शासनाने केला व शिक्षा प्लाॅटधारकांना हा कोणता न्याय ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी उपस्थित केला आहे. सुमारे १०४ जणांनी सदर जमीन राहत्या घराकरीता खरेदी केली. मात्र सर्व व्यवहार झाल्यानंतर ही जमीन सरकारजमा करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आता प्लाॅटधारकांनी टाव्हरे यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे. या बाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर भोगावटा २ वर्ग,महारवतनाची जमीन मा.जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा)यांचे कार्यालयाकडील पत्र दि.२२/०२/२०१९ नुसार रितसर परवानगी घेऊन संबधित व्यक्तीने खरेदी केली होती. तत्कालीन तहसीलदार खेड ,सुचित्रा आमले यांचे दि.१७/०१/२०२०चे पत्रानुसार जमीन गट नं १२६ या मिळकतीचे शेती व्यतिरिक्त वापराचे ५० टक्के मुल्य शासन जमा करणेत येवून जमीन भोगावटादार वर्ग १ करणेत आलेली आहे. भोगावटादार वर्ग १ मध्ये जमीन रूपांतरित झाल्याने नागरिकांनी प्लाॅट खरेदी केले आहेत. काहींनी घराची बांधकामे केली आहेत.तक्रारीनंतर जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांचे कार्यालयाकडील दि. दि.२१/०९/२०२२चे पत्रानुसार महाराष्ट जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ५९(ब) नुसार विषयांकित जमीन मिळकत सरकार जमा करणेबाबत मा.जिल्हाधिकारी यांचेवतीने तहसीलदार खेड यांना प्राधिकृत करण्यात आले होते.परंतु कुळकायदा शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय यांनी अटी शर्थीचा भंग तहसीलदारांनी केला होता याबाबीकडे पुर्ण दुर्लक्ष केले ही बाब गंभीर आहे. तहसीलदार खेड यांनी संबधित प्रकरणी अंतिम आदेश पारित केला आहे.त्यांनी आदेशात तत्कालीन तहसीलदार यांनी अनाधिकाराने सक्षम अधिकारी यांचे परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीने इनाम वर्ग ६ ब या मिळकतीवरील नवीन शर्त कमी करून भोगावटादार वर्ग १ दाखल केला आहे असे म्हटले आहे.
जर पुर्वीच्या तहसीलदारांनी आवश्यक नजराणा भरून घेऊन भोगावटादार १ मध्ये रूपांतरितचे आदेश दिले.त्यानुसार प्लाॅटधारकांनी जागा खरेदी केली व त्यानुसार नोंदीही झाल्या.ज्योती देवरे,तहसीलदार खेड वा कुळकायदा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सुचित्रा आमले यांच्याकडून खुलासा मागविणे,सुनावणीमध्ये त्यांना प्रतिवादी करणे,त्यांच्यावर कारवाई करणे या बाबी का केल्या नाहीत ? तत्कालीन तहसीलदार,मंडल अधिकारी,तलाठी यांनी अकृषक,भोगावटा एक नोंदी केल्या.हे सर्व शासनाचे प्रतिनिधी आहे.त्यावर विश्वास ठेवून जागा खरेदी केल्या. जिल्हाधिकारी परवानगी आवश्यक असताना तहसीलदार खेड यांनी आदेश दिले ही बाब प्रशासनाला तेव्हा का लक्षात आली नाही? गट नं १२६ मधील जमीन सरकारजमा करण्याचा निर्णय हा १०४प्लाॅटधारकांचे आयुष्य अंधारमय करणार आहे.
तातडीने सदर निर्णयाबाबत सखोल चौकशीचे आदेश देऊन संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करून जमीन सरकारजमा करण्याचा निर्णय मागे घेऊन गोरगरीबांना दिलासा द्यावा.अकृषक व भोगावटा एक साठी आवश्यक नजराणा भरल्याने शासनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु गोरगरीब प्लाॅटधारकांना संपविण्याचा खटाटोप झाला आहे.
श्रीमती ज्योती देवरे यांची खेडचे तहसीलदार म्हणून जुलै २०२४ मध्ये शासनाने नियुक्ती केली, परंतु दि.६ मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती बेकायदा ठरविली, शासनाने दि.२६ मार्च रोजी त्यांना कार्यमुक्त केले आहे. जर नियुक्तीच बेकायदा तर त्यांचे निर्णय वैध कसे? वरिष्ठ न्यायालयात अंतिम निर्णय होईपर्यंत आदेशाला स्थगिती द्यावी.आदेशाचे पुनर्विलोकन व्हावे अशी मागणी यावेळी टाव्हरे यांनी केली. तरी प्लाॅटधारकांना न्याय मिळावा, सरकारजमा करण्याचा आदेश राजकीय दबावातून झाला आहे, वरिष्ठ न्यायालयात निर्णय होईपर्यंत स्थगिती मिळावी. विधानसभा अध्यक्षांनी कपात सुचना दि.१७ मार्च रोजी स्वीकारली आहे. महसुल विभागानेही दि ३ एप्रिल रोजी महसुल विभागाने जिल्हाधिकारी यांना चौकशीचे लेखी निर्देश दिले आहेत. अंतिम चौकशी होईपर्यंत कोणतीही चुकीची कारवाई करू नये असा आक्रोश प्लाॅटधारकांनी केला. यावेळी सुशील दौंडकर, नेहा काटकर, दिपक जगताप, संदीप कोकरे, प्रथमेश ढेरंगे, शीतल दौंडकर, वनिता एरंडे, कपिल यादव, राहुल अभंग, सुभाष आहेरकर, किरण जगताप व प्लाॅटधारक उपस्थित होते.
प्लाॅटधारक
- काळुराम तुळशिराम बनकर. रा. चिवळी, ता. खेड, जि. पुणे
- प्रविण अरुण कडलग.
- मयुर बाळू अभंग.
- सुमंत गयानंद मिश्रा.
- सुरेखा अतुल दौंड
- हेमंत दयानंद मिश्रा.
- राहुल बालू अभंग.
- कल्पना सुदाम सुकाळे.
- शमीर शब्बीर शेख.
- निखील गणेश गिरीगोसावी.
- श्रीकांत बबन ठाकूर.
- मंगल सदाशिव गारगोटे.
- सचिन दादाराव नरवडे.
- रुपाली रुपेश गावडे.
- सलमान शब्बीर शेख.
- रोहित राजेंद्र पारख.
- अनिल यशवंत पोटघनं.
- सदाशिव भिकाजी गारगोटे.
- कपिल धनिलाल यादव.
- सुरेखा नटवरलाल रावळ.
- कामिनीदेवी अमरिशकुमार यादव.
- सुवर्णा सत्यवान कोळेकर.
- तेजराव दासू चव्हाण.
- सुशिल मारुती दौंडकर.
- निलेश दत्तात्रय अभंग.
- सुशिला नवनाथ पोखरकर
- नेहा सचिन काटकर.
- संजयकुमार रामदास गोसावी.
- प्रथमेश दत्तात्रय ढेरंगे.
- संतोष अशोक शिंदे.
- विशाल बालू खातळे,
- राजश्री संजय शिंदे.
- अरविंद कुमार ताम्रकार.
- अक्षय साहेबराव गावडे.
- किरण दत्तात्रय जगताप.
- अमोल कुंडलिक गि-हे.
- वनिता गणेश एरंडे.
- रुपेश राजाराम गावडे..
- मनिषा संतोप बोन्हांडे.
- मुधकर तुकाराम दौंडकर.
- तान्हाजी सखाराम हगवणे,
- अमोल वसंत गवते.
- अश्विनी बाबुराव खाडे.
- कृष्णा सुधाकर सुर्यवंशी.
- नयना शशिकांत केदारी.
- प्रकाश अशोक घडवजे.
- विमल अशोक तांबे.
- शिल्पा देवजी जाधव.
- शितल मधुकर दौंडकर.
- रविंद्र शिवराम पाटील.
- रोहित राजेंद्र पारख.
- प्रविण अरुण तनपुरे.
- सादीश साहोन शाह
- मानया सुर
- सोनाली सुभाष आहेरकर.
- संदिप हरिभाऊ खाडे.
- मोहन गंगाधर दुराफे
- मंगेश कबरु नाडे.
- स्नेहल अनिकेत वाघमारे.
- हिना कौसर मुनयर सहर
- अतुल गिरीश बांगडी
- रेणुका सुमिशन रोल्लार
- मासा सतिया कोरडे.
- संदिप तुकाराम कोकरे,
- अश्विनी नानासाहेब करावे.
- उन्बाला मुलाल पाटील.
- अंकित सुनिल शोलार
- कविता यावयानी लांडे.
- किरण वसंत शिंदे.
- गणपत वामन मरभज
- गुलाब मोहन गोरे.
- गौरी कृष्णा तुरे.
- दत्तात्रय नामदेव सावंत.
- दिनेश शंकर कुन्हाडे.
- दिपक पितांबर अहिरराव.
- बबन दगडू पायागकर
- दिपीका भालचंद्र ठाकरे.
- योगेश दिलीप भांबुरे.
- देविदास काशिनाथ माळवे.
- रामराव महादेव नियोजले.
- पंकज पितांवर अहिरराव.
- राहुल बाबासाहेब रनशूर
- प्रज्ञा प्रदिय काये.
- रुपेश राजाराम गावडे.
- प्राजक्ता सचिन हुरसाळे.
- लालू मारुती तुरे.
- भालचंद्र नरेंद्र ठाकरे.
- वसंत पर्वती लोंडे.
- मनिषा देविदास माळवे.
- विजय दिलीप भांबरे.
- मिरा मिलींद वाढाणे.
- शिवाजी बवन खुडे.
- राहुल सुनिल सोनार.
- सचिन पांडुरंग पारधी.
- शैला मनोहर बोन्डाडे.
- सिताराम मारुती तुरे.
- सारिका बाळासाहेब राठोड.
- सिंधु वसंत लोड.
- सुवर्णा मधुकर गुंडाळ
- सुषमा स्वप्नील मंडलिक
- दिपक बाळासाहेब जगताप.
- स्वप्नील भरत मंडलिक. सर्व रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे
- नितीन शिवाजी सुकाळे.
- निलेश विठठल थोरवे.
0 टिप्पण्या