विलेपार्ले पूर्वेला स्टेशनच्या समोर रामकृष्ण नावाचे अत्यंत लोकप्रिय शाकाहारी हॉटेल आहे. हे हॉटेल ज्या हाउसिंग सोसायटीत आहे, त्या सोसायटीचे नाव आहे नेमिनाथ को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. या सोसायटीची मालकी असलेल्या खाजगी मालमत्तेत आणि भूखंडावर श्रीपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर काही लोकांनी निहित स्वार्थाकरता पूर्णपणे बेकायदेशीरपणे बांधले होते. नेमिनाथ हाऊसिंग सोसायटीने ४७ वर्षांपासून हे अनधिकृत जैन मंदिर पाडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्याची कहाणी अशी की या जागी एक बंगाली मांसाहारी कुटुंब राहत होते, ज्यांनी ही जागा काही आर्थिक अडचणींमुळे रिकामी केली. खरं तर पूर्वी मांसाहार होत असलेल्या/झालेल्या ठिकाणी कोणतेही जैन मंदिर शक्यतो बांधले जात नाही. परंतु हे जैन मंदिर अनधिकृतपणे मुद्दाम बांधले गेले.हे अनुधिकृत असल्यामुळे ते पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मा.उच्च न्यायालयाने अनेक वेळा आदेश दिले होते.परंतु वेळोवेळी न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाला नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या बिल्डरचा मुलगा अनिल चंदूभाई शाह यांनी कधी कोर्टाची दिशाभूल करून तर कधी अधिकाऱ्यांना मॅनेज करून रोखले. नेमिनाथ हाऊसिंग सोसायटी मात्र हे अनधिकृत जैन मंदिर पाडण्यासाठी सुमारे ४७ वर्षांपासून खटला लढत होती.कारण या अनधिकृत बांधकामामुळे सोसायटीला भोगवटा प्रमाणपत्र/ओ.सी.(OC)मिळत नव्हते. वास्तविक पाहता बिल्डरने आय.ओ.डी. (IOD) च्या अटी व शर्तीनुसार अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करून भोगवटा प्रमाणपत्र सोसायटीला द्यायला हवे होते. परंतु त्याने तसे केले नाही आणि अनधिकृत जैन मंदिर बांधायला प्रोत्साहन दिले. सोसायटीने ओ.सी. मिळवण्यासाठी न्यायालयात केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने वेळोवेळी आदेश देऊन सुद्धा बिल्डरच्या मुलाने अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले.न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ दिली नाही.जिथे एका बंगाली मांसाहारी कुटुंबाचे घर होते, इतकी वर्षे जिथे मांस, मासे, अंडी शिजवले आणि खाल्ले जात होते, ज्यामुळे जैन तत्त्वज्ञानानुसार ते ठिकाण पूर्णपणे अपवित्र झाले होते,तिथे जैन मंदिर बांधले जाऊ शकते का? हा प्रश्न कोणीच विचारत नाही. जिथे अनधिकृत बांधकाम केले गेले त्या संरचनेचा एफ.एस.आय बिल्डर शाह- दोशी आणि कंपनीने त्यांच्याच नवीन इमारतीत/सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामात वापरला होता. नेमिनाथ इमारतीचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी, अगोदरच्या बंगाली मांसाहारी भाडेकरूने घर रिकामे केले होते.परंतु १९७६ मध्ये इमारत पूर्ण होताच (५० वर्षांपूर्वी), बिल्डर चंदूभाई शहा यांचे पुत्र अनिल शहा यांनी ती इमारत पाडण्याऐवजी काही दिगंबर साधूंना बेकायदेशीरपणे पूजा करण्याची परवानगी दिली आणि त्याचा गैरवापर सुरू केला.
१६/०४/२०२५ रोजी बी.एम.सी.ने अनधिकृत जैन मंदिर तोडताना न्यायालयाच्याच आदेशाची अंमलबजावणी केली, जी केव्हाच करायला पाहिजे होती. आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की धर्माच्या नावावर अधर्माने वापरलेल्या सर्व बेकायदेशीर बांधकामांबाबत कारवाई होणे आवश्यक आहे.मग ते हिंदू मंदिर असो,जैन देरासर असो, मुस्लिम मज्जार असो किंवा मस्जिद असो,मदरसा असो किंवा चर्च असो. या संपूर्ण प्रकरणात नेमिनाथ सोसायटीतील रहिवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.कारण वेळोवेळी बाहेरील जैन लोक जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे नेमिनाथ सोसायटी च्या खाजगी मालमत्तेत पूजा करण्यासाठी वाहने आणुन पार्क करत होते.सोसायटीचे आवार जाम करत होते.सोसायटीच्या सदस्यांची वाहने अडवून त्यांना त्रास देत होते!..... या अनधिकृत जैन मंदिराचा कोणालाही त्रास नव्हता,जैन मंदिर अनधिकृतपणे खाजगी जमिनीवर बांधले गेले आहे हे बाहेरून येणाऱ्या जैन भक्तांना माहीत नव्हते असे म्हणणे खरे नाही. जेव्हा जेव्हा सोसायटीतील रहिवासी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल बाहेरील भक्तांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तेंव्हा बाहेरून आलेले जैन भक्त मोठ्या आवाजात भांडू लागायचे,कारण ते मोठ्या संख्येने असायचे....हेच कटू सत्य आहे....... स्वतःला शांतीप्रिय म्हणणाऱ्या जैन भक्तांच्या दादागिरी पासून नेमिनाथ सोसायटीच्या रहिवाशांची आता अनधिकृत जैन मंदिर पाडल्यामुळे मुक्तता झाली आहे हेच या प्रकरणातले कटू पण सत्य आहे.
- नरेंद्र काणकिया,
- नेमिनाथ को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील रहिवासी
0 टिप्पण्या