शेतकरी वडिलांच्या घरी जन्मलेल्या जमुना ओडिशातल्या रैरंगपूर गावात वाढल्या. जमुना आणि त्यांच्या भावंडांनी जंगलाच्या सावलीतच आपले बालपण घालवले. या काळात त्या शेतीकामात वडिलांना मदत करत असत.
लग्नानंतर जमुना जेव्हा झारखंडला आल्या, तेव्हा इथल्या बेकायदेशीर वृक्षतोडीने त्या व्यथित झाल्या आणि हे थांबवण्याचा निर्णय घेतला. याच उद्देशाने जमुना यांनी 2000 साली एक मोहीम सुरू केली आणि हळूहळू त्यांनी आपल्यासारख्याच विचारसरणीच्या इतर महिलांना जंगल वाचवण्यासाठी एकत्र आणले.
2004 मध्ये त्यांनी गावाबाहेर पडून पंचायत ते Block Level पर्यंत जंगलाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती सुरू केली. जमुनाच्या या कार्यामुळे लाकूड माफिया त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू लागले.
यामुळेच एकदा त्यांच्या घरावर दरोडाही पडला. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप धमकावले, पण जमुना या धमक्यांना घाबरणाऱ्यांपैकी नव्हत्या.
या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत जमुना टुडू यांच्यासोबत 10 हजारांहून अधिक महिलांची सेना तयार झाली. ही सेना स्वसंरक्षण आणि जंगल तोडणाऱ्या घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी हातात काठ्या आणि बाण-धनुष्य घेऊन फिरते.
आपल्या निर्भयतेने आणि धैर्याने जमुना आजही अनेक अडचणींवर मात करत जंगलं वाचवत आहेत. जमुना टुडू यांना लोक आता झारखंडची ‘Lady Tarzen’ म्हणून ओळखतात.
जमुना टुडू यांना या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याआधी 2013 मध्ये त्यांना Phillips बहादुरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
देशाची प्रत्येक मुलगी जर जमुनासारखी असेल, तर त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी कुणाचीही गरज भासणार नाही
0 टिप्पण्या