"भूषण गवई" बहुजन चेहरा हा सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत, पुढील महिन्यात ते आपले कामकाज सुरूही करतील, त्या अगोदरच बहुजन संघटना स्वतः च्या टिऱ्या बडवायला लागल्या आहेत, सोशल मीडिया वर गवई यांच्यावर अभिनंदनाच्या पोस्ट सुरू झाल्यात, जाहीर कार्यक्रम करुन सत्कार सुरू झालेत, सगळीकडे एकच प्रचार आमचा माणूस, आमच्या जातीचा माणूस, आमच्या समाजाचा माणूस म्हणून!
पण देशाची सध्याची अवस्था काय आहे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात सांगायचं तर जिथं न्यायव्यवस्थाच सत्तेची रखेल झाली असताना या सत्तेने मांडलेल्या रांड बाजारात तुमच्यातला माणूस जावून काय करणार? लोकशाहीचे चारही खांब संसद, न्यायव्यवस्था, प्रचार प्रसार माध्यम आणि प्रशासन याच या सत्तेच्या बाजारात पालथ्या पडल्या असताना नविन वेगळं काय होणार? संविधानाने स्वतंत्र अधिकार दिलेल्या या स्वायत्त संस्था ज्यांच्यावर आपला पिढ्यानपिढ्या विश्वास होता ती पोलीस यंत्रणा, CBI व ED सारखी तपास यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, न्याय व्यवस्था, प्रचार प्रसार माध्यम यासारख्या देशाच्या कारभारावर लक्ष ठेवणाऱ्या संविधानिक संस्थाच सत्ताधिशांची गुलामी करत असताना तुमच्या समाजातील चेहरा आणखीन वेगळं काय करणार?- का हे भूषण गवई पुलवामा हत्याकांडातील शहीद सैनिकांच्या विधवांना न्याय मिळवून देऊ शकतील?
- या माजलेल्या सत्तेने ज्या हिरेन पांड्या, उमर खालिद आणि इतर अनेक बहुजन नायकांना तुरुंगात खितपत ठेवलंय त्यांना हे भूषण गवई सन्मानाने बाहेर काढतील का?
- न्यायमूर्ती लोया यांचे हत्यारे अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करुन न्यायमूर्ती लोया यांना न्याय मिळवून देतील का?
- 2024 लोकसभा निवडणुकीतील घपला केलेल्या 74 लोकसभा खासदारांना घरी बसवतील का?
- 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घपला केलेल्या 95 आमदारांना घरी बसवतील का?
- निवडणूक आयुक्त राजीव कुमार गँग ने जे 76 लाख मतदान अधिक दाखवलंय त्याची पारदर्शक सुनावणी करुन या अनधिकृत फडणवीस सरकार का खाली उतरतील का?
- निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेली EVM मशीन ची केस निकालात आणून पून्हा Ballot पेपर वर निवडणूका घेण्यास निवडणूक आयोगाला सांगतील का?
- भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असलेल्या नोटबंदी भ्रष्टाचारात दोषी असलेल्या नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर कारवाई करतील का?
- याशिवाय राफेल भ्रष्टाचार व त्याच्या फायली गहाळ झाल्या असे न्यायालयात सांगणाऱ्या प्रधानमंत्री कार्यालयच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतील का?
- भारतभरात हिंदू राष्ट्राच्या नावावर जो
- माजलेल्या सत्तेने हिंसाचार चालवलाय तो थांबवून यात बळी गेलेल्या कुटुंबाना न्याय मिळवून देवू शकतील का?
या अशा अनेक केसेस आहेत, ज्यामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडालाय त्या सर्व केसेस ना न्याय देऊन जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास परत मिळवतील का? अशा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे होकारात असतील तर आणि तरंच भूषण गवई यांचा सत्कार करा, त्यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त करा, सोशल मीडिया वर अभिनंदनाच्या पोस्ट शेअर करा .नाहीतर न्यायाधीश भूषण गवई यांना जिथे असतील तिथे घेराव घाला, त्यांना हे प्रश्न विचारा!
मित्रांनो, सध्या माझा समाज माझी जात या पेक्षा संकटात असलेल्या देशाला वाचविणे गरजेचे आहे.
-प्रमोद शिंदे
सचिव व प्रवक्ता, मुंबई प्रदेश
संभाजी ब्रिगेड
9967013336
0 टिप्पण्या